कीव, युक्रेन CRASHED F16 PLANE : रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचं मोठे नुकसान झालंय. गुरुवारी F-16 लढाऊ विमानांपैकी एक विमान क्रॅश झाल्याची माहिती युक्रेनं दिलीय. F16 च्या क्रॅशसोबतच युक्रेनच्या एका टॉप पायलटचाही मृत्यू झाला आहे. ही घटना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे.
रशियन ड्रोन हल्ल्यात F-16 क्रॅश : युक्रेनच्या हवाई दलानं गुरुवारी या घटनेची माहिती दिली. एका लष्करी निवेदनात म्हटलं आहे की, रशियानं युक्रेनवर मोठं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्यानं सोमवारी F16 लढाऊ विमान कोसळलं. युक्रेनचं अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, काही रशियन क्षेपणास्त्रे आणि ड्रोन त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच F16 विमानांनी पाडले.
कुर्स्कमध्ये युक्रेनचंही मोठं नुकसान : युक्रेननं दावा केला आहे की, त्याच्या सैन्यानं रशियाच्या कुर्स्क प्रदेशात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याच वेळी, रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं मंगळवारी सांगितलं की, कुर्स्कमध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. या युद्धात रशिया युक्रेनवर सातत्यानं प्राणघातक हल्ले करत आहे. सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री रशियानं संपूर्ण युक्रेनला क्षेपणास्त्रे आणि ड्रोननं लक्ष्य केलं. ज्यात अनेक लोक मारले गेले. रशियानं युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं. या रशियन हल्ल्यांचा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी निषेध केला.
F16 विमानाचं वेगळेपण : 1974 मध्ये, F16 विमानानं प्रथमच अमेरिकन हवाई दलाच्या सेवेत प्रवेश केला. F16 हे आजही जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक मानलं जातं. याचं कारण म्हणजे त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा. जरी त्याचं बाह्य स्वरुप फारसं बदललं नसलं तरी, F16 विमान अजूनही प्रगत वैशिष्ट्ये आणि तांत्रिक प्रगतीमध्ये आघाडीवर आहे. अनेक दशकांपासून युद्धभूमीवर आलेल्या अनुभवाच्या आधारे विमानात सातत्यानं सुधारणा केली जात आहे. जगातील विविध राष्ट्रांनी लढाऊ विमानं विकसित केली असली तरी, वास्तविक युद्धभूमीवर दीर्घकाळ उड्डाण करण्याची क्षमता सिद्ध करण्यात F16 ची बरोबरी आजपर्यंत कोणीही केलेली नाहीय.
अत्याधुनिक रडार : उड्डाण करताना संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हे विमान APG-83, 5 रडारनं सुसज्ज आहे. ते येणाऱ्या क्षेपणास्त्रांचं किंवा विमानाचे अंतर आणि क्षमतेचं अचूक निरीक्षण करतं. तसंच पायलट डिजिटल नकाशा तयार करून वैमानिकाला इशारा देतं.
वर्धित बॅटलस्पेस जागरूकता : ध्वनीच्या दुप्पट वेगानं हे विमान प्रवास करतं. त्यावेळी वैमानिकाला हल्ला करण्यासाठी काहीही समोर दिसत नाही. त्यामुळं या विमानात बसवलेलं सेन्सर लक्ष्यांचा पाठलाग करतात. तसंच वैमानिकाला व्हिज्युअल मॅपच्या माध्यमातून निरिक्षण करता येतं. हा डिस्प्ले पायलटच्या हेल्मेटवर बसवण्यात आला आहे.
वैमानिकांसाठी सुरक्षा : F16 विमान उत्पादक लॉकहीड मार्टिननं विकसित केलेली ऑटोमॅटिक ग्राउंड कोलिशन अवॉयडन्स सिस्टीम (ऑटो जीसीएएस), जेव्हा पायलटचं नियंत्रण सुटतं, तेव्हा विमान सुरक्षितपणे उतरण्यास मदत होते. लॉकहीड मार्टिननं त्याच्या अधिकृत वेबसाइटवर सांगितलं की 2014 पासून या तंत्रज्ञानानं विमानातील स्फोट 26 टक्क्यांनी कमी केले आहेत.
180 प्रकारची शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम : लॉकहीड मार्टिनच्या मते, F16 180 प्रकारची शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यांचा दावा आहे की, जगातील इतर कोणत्याही लढाऊ विमानात ही क्षमता नाही. युक्रेननं जगातील सर्वात अत्याधुनिक विमान तर गमावलंच, पण ते उडवण्यासाठी प्रशिक्षित वैमानिकही गमावला आहे. ज्यावर जगाचं बारीक लक्ष आहे.
हे वाचलंत का :