हैदराबाद Citroen SUV : Citroen कंपनीनं सोमवारी Citroen Aircross SUV चं अपडेटेड मॉडेल लाँच केलं. या कारची सुरवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे. टॉप व्हेरिएंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे. या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स, नवीन इंजिन पर्यायासह नावात बदल केल्याचा समावेश आहे. या कराचं बुकिंग सुरू झालं असून 8 ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
काय आहे नवीन फिचर : कंपनीनं एअरक्रॉस एसयूव्हीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एलईडी हेडलाइट्स आणि मागील पॉवर विंडो बटणे सेंटर कन्सोलमधून काढून मागील दरवाजाच्या पॅडवर बसवण्यात आली आहे. याशिवाय, मागील एसी व्हेंट, नवीन ग्रॅब हँडल, इलेक्ट्रिकली फोल्डिंग विंग मिरर, मोठा स्लाइडिंग आर्मरेस्ट आणि डॅशबोर्डवर सॉफ्ट-टच सामग्री जोडण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं, Citroen नं सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग आणि सीट बेल्ट रिमाइंडर दिले आहेत.
Citroen Aircross SUV इंजिन : Citroen नं या मॉडेलमध्ये नवीन 82hp आणि 115Nm 1.2-लिटर, 3-सिलेंडर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतं. त्यामुळं एसयूव्हीची सुरुवातीची किंमत कमी झाली आहे. याशिवाय, 110hp आणि 190Nm सह 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील उपलब्ध आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.
या कारशी असेल स्पर्धा? : भारतीय बाजारपेठेत सिट्रोएन एअरक्रॉस SUV थेट Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara आणि Honda Elevate सारख्या SUV शी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :
- 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना पेन्शन, घरबसल्या मिळणार 6 हजार रुपये मासिक - PMKMY
- सॅमसंग, वनप्लससह ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार 'हे' स्मार्टफोन, पाहा यादी - New smartphone launched in October
- 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट, 18 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन, रिचार्ज दर ऐकून व्हाल थक्क - 3 months free internet