ETV Bharat / technology

आता स्पॅम कॉल होणार ब्लॉक, नवीन स्पॅम ट्रॅकिंग सिस्टमची घोषणा

केंद्र सरकारनं नवीन स्पॅम ट्रॅकिंग सिस्टमची घोषणा केलाय. त्यामुळं वापर्कत्यांची आता स्पॅम कॉलपासून सुटका होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

नवी दिल्ली new spam tracking system : केंद्र सरकारनं मंगळवारी आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्यासाठी नवीन स्पॅम-ट्रॅकिंग सिस्टमची घोषणा केलीय. ही प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. त्यामुळं 24 तासांच्या आत, आंतरराष्ट्रीय कॉलपैकी अंदाजे 1.35 कोटी स्पॅम कॉल ओळखण्यात आले आहेत. 'इंटरनॅशनल इनकमिंग स्पूफड कॉल्स प्रिव्हेन्शन सिस्टीम' लाँच करताना केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, सुरक्षित डिजिटल जाग निर्माण करण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याच्या दिशेनं सरकारचा हा आणखी एक प्रयत्न आहे.

बनावट कॉलमध्ये घट होणार : या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळं, भारतीय दूरसंचार ग्राहकांना +91 क्रमांकावरून येणाऱ्या अशा बनावट कॉलमध्ये लक्षणीय घट दिसून येईल. सायबर गुन्हेगार भारतीय मोबाईल क्रमांक (+91) दाखवून आंतरराष्ट्रीय बनावट कॉल करून गुन्हे करत आहेत. हे कॉल्स भारतातून येत असल्याचं दिसतं. परंतु प्रत्यक्षात कॉलिंग लाइन आयडेंटिटी (CLI) किंवा सामान्यतः फोन नंबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्यामध्ये फेरफार करून परदेशातून केले जात असल्याचा दाखवलं जातय. हे बनावट कॉल आर्थिक घोटाळे, सरकारी अधिकाऱ्यांची तोतयागिरी करण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी वापरले जात आहेत. यातून मोबाईल नंबर ब्लॉक करण्याची धमकी देणे, बनावट डिजिटल अटक करणे, कुरिअरमध्ये ड्रग्ज/अमली पदार्थ, पोलिस अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून फसवणूक करणे, सेक्स रॅकेटमध्ये अटक करणे इत्यादी सायबर गुन्ह्यांची प्रकरणं उघडकीस आली आहेत.

आंतरराष्ट्रीय कॉल ओळखले जाणार : डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन्स (DOT) आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांनी संयुक्तपणे एक प्रणाली विकसित केली आहे. ज्या अंतर्गत अशा प्रकारचे फसवे आंतरराष्ट्रीय कॉल ओळखले जातील. ते भारतीय दूरसंचार ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखलं जातील, असं सरकारनं म्हटलं आहे. "इतके चांगले प्रयत्न करूनही, फसवणूक करणारे इतर मार्गानं यशस्वी होतात, अशी प्रकरणे असू शकतात. अशा कॉलसाठी, तुम्ही संचार साथीवरील चौकशी वैशिष्ट्यावर अशा संशयित फसव्या संप्रेषणांची तक्रार करून मदत करू शकता." सायबर फसवणुकीपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी दूरसंचार विभागानं उचललेलं हे आणखी एक पाऊल आहे. कारण सिस्टीम इनकमिंग इंटरनॅशनल कॉल्स ओळखून ते ब्लॉक करतं.

हे वचालंत का :

  1. स्पॅम कॉलपासून सुटका : कोळसा खाणीतही चालणार हायस्पीड इंटरनेट, संकटात होईल मदत
  2. CM नायडू यांच्या हस्ते भारतातील पहिल्या DGCA मध्यम श्रेणी कृषी ड्रोनचं उद्घाटन
  3. Meta ने सेलेब-बैट घोटालों का पता लगाने और रोकने के लिए पेश किया यह खास फीचर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.