हैद्राबाद Sukhoi 30 MKI aircraft : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीनं देशाचा संरक्षण विभाग बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दलानं आपल्या मुख्य लढाऊ विमान सुखोई-30 साठी 26 हजार कोटी रुपये खर्चून 240 एरो इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
Cabinet Committee on Security, on September 02, 2024, approved the proposal for procurement of 240 aero-engines (AL-31FP) for Su-30 MKI aircraft of the Indian Air Force (IAF) under the Buy (Indian) category from Hindustan Aeronautics Limited (HAL) at a cost of over Rs 26,000… pic.twitter.com/26QaZyTUUR
— ANI (@ANI) September 2, 2024
240 एरो-इंजिन खरेदी : एका निवेदनात म्हटलं आहे की, या एरो-इंजिनची डिलिव्हरी एक वर्षानंतर सुरू होईल. हवाई दलाच्या सुखोई 30 MKI लढाऊ विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून खरेदी श्रेणी अंतर्गत 240 एरो-इंजिन (AL-31 FP) खरेदी केली जातील. या विमानांच्या खरेदीसाठी सर्व कर आणि शुल्कासह 26 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल.
54 टक्क्यांहून अधिक स्वदेशी पार्ट : संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात, म्हटलं आहे की, या इंजिनांमध्ये 54 टक्क्यांहून अधिक स्वदेशी बनावटीचे पार्ट असतील. एचएएलच्या कोरापुट विभागात या पार्टचं उत्पादन केलं जाईल. सुखोई-30 विमान हे हवाई दलातील सर्वात शक्तिशाली विमान आहे. HAL कडून या एरो-इंजिनचा पुरवठा हवाई दलाच्या ताफ्याच्या गरजा पूर्ण करेल. त्यामुळं देशाची संरक्षण क्षमता अणखी मजबूत होईल.
3 हजार किलोमीटरपर्यंत हल्ला करण्यास सक्षम : सुखोई 30 एमकेआयच्या वैशिष्ट्याबद्दल बोललो तर, ते रशियन बनावटीचं ट्विन सीटर ट्विन इंजिन मल्टीरोल फायटर जेट आहे. या जेटमध्ये 8 हजार किलो बाह्य शस्त्रास्त्रांसह एक 30 मिमी जीएसएच तोफा वाहून नेण्याची क्षमता आहे. हे विमान हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत एकाच वेळी लक्ष्यांवर हल्ला करू शकतं. सुखोई30 एमकेआय 3 किलोमीटरपर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे. भारतीय हवाई दलाकडं 260 अधिक सुखोई 30 MKI फायटर विमान आहे.
हे वाचलंत का :