हैदराबाद BSNL D2D Service : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नं भारतातील पहिली उपग्रह-टू-डिव्हाइस सेवा सुरू केलीय. ही सेवा देशातील दुर्गम भागात अखंड कनेक्टिव्हिटीसाठी राबवण्यात येणार आहे. BSNL ने ही सेवा कॅलिफोर्नियास्थित कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंपनी Viasat च्या सहकार्यानं सुरू केली आहे. ही सेवा सेल्युलर कव्हरेज नसलेल्या भागात नेटवर्क शिवाय संपर्क साधण्यात मदत करणार आहे.
BSNL launches India’s 1st Satellite-to-Device service!
— DoT India (@DoT_India) November 13, 2024
Seamless connectivity now reaches India’s remotest corners. pic.twitter.com/diNKjaivFo
भारतीय दूरसंचार विभागनं (DOT) बुधवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये BSNL ची डायरेक्ट-टू-डिव्हाइस सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या सेवेची विशेष बाब म्हणजे सिम कार्डशिवाय स्मार्टफोनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येतील. ही सेवा विशेषतः दुर्गम भागात प्रवास करणाऱ्या किंवा राहणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
BSNL D2D सेवा सुरू : BSNL ने Viasat च्या सहकार्यानं D2D (डायरेक्ट-टू-डिव्हाइस सेवा) ची यशस्वी चाचणी केली. भारतीय मोबाइल काँग्रेस (IMC) 2024 मध्ये गेल्या महिन्यात ही सेवा भारतात सादर करण्यात आली. भारतातील डिजिटल डिव्हाईड दूर करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. BSNL च्या मते, डायरेक्ट-टू-डिव्हाइस उपग्रह कनेक्टिव्हिटी सेवेची यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात आली आहे. ज्यामध्ये दुर्गम आणि आव्हानात्मक ठिकाणी कनेक्शनचे परिणाम दिसून आले आहेत. या सेवेमुळं सॅटेलाइट नेटवर्कद्वारे स्मार्टफोनही जोडले जाऊ शकतात. ज्यासाठी मोबाईल नेटवर्कची गरज नाहीय. कंपनीनं आपत्कालीन वापरासाठी Apple च्या iPhone 14 सारख्या उपकरणांमध्ये ही सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आधीच दिली आहे.
BSNL D2D (डायरेक्ट-टू-डिव्हाइस) सेवेचे फायदे :
दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी : BSNL ची ही सेवा देशातील दुर्गम भागात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
आपत्कालीन कॉल : सेल्युलर आणि वाय-फाय नेटवर्क उपलब्ध नसतानाही वापरकर्ते आपत्कालीन कॉल करू शकतात आणि SoS संदेश पाठवू शकतात.
UPI पेमेंट : सेल्युलर आणि वाय-फाय नेटवर्क उपलब्ध नसलेल्या परिस्थितीतही वापरकर्ते UPI पेमेंट करू शकतात.
सर्वसामान्यांसाठी उपलब्ध : ही सेवा प्रथमच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, यापूर्वी ही सेवा केवळ सरकारी आणि लष्करी वापरासाठी उपलब्ध होती.
द्वि-मार्गी संवाद : BSNL ची सेवा द्वि-मार्गी संप्रेषण क्षमता प्रदान करते, ज्यामुळे वापरकर्ते दुर्गम भागातही कनेक्ट राहू शकतात.
नॉन-टेरेस्ट्रियल नेटवर्क (NTN) कनेक्टिव्हिटी: ही सेवा पृथ्वीपासून 36 हजार किमीवर स्थित एल-बँड जिओस्टेशनरी उपग्रहांद्वारे एनटीएन कनेक्टिव्हिटीचा वापर करेते. मात्र, आपत्कालीन परिस्थितीव्यतिरिक्त दररोजच्या वापरासाठी नियमित कॉल किंवा एसएमएसला ही सेवा समर्थन देणार की नाही, याबद्दल कंपनीनं माहिती दिलेली नाहीय.
हे वाचलंत का :