वॉशिंग्टन Boeing Starliner return to Earth : बोइंगचे स्टारलाइनर अंतराळयान 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना घेऊन अवकाशात झेपवलं होतं. या मोहिमेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठवडाभर राहिल्यानंतर सुनीता विल्यम्ससह त्यांचे सहकारी बुच विल्मोर परतणार होते. मात्र, बोइंगची स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये बिघाड झाल्यानं त्यांना पृथ्वीवर परत आणण्यात अडचणी येत आहेत.
NASA and Boeing have concluded their Delta-Flight Test Readiness Review, polling “go” to proceed with undocking of the uncrewed #Starliner spacecraft no earlier than 6:04pm ET Sept. 6 from @Space_Station, pending weather and operational readiness.
— NASA Commercial Crew (@Commercial_Crew) August 29, 2024
More: https://t.co/maW6YVq5Az pic.twitter.com/xH88RZs82H
सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांना दिलासा नाही : अंतराळात 12 आठवडे घालवल्यानंतर, बोइंगचं स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) मायदेशी परतण्यासाठी सज्ज झालं आहे. स्टारलाइनर अवकाशातून पृथ्वीवर परतणार असल्याचं नासानं म्हटलं आहे. मात्र, त्यात सुनीता विल्यम्स तसंच त्याचे सहकारी बुच विल्मोर परतणार नाहीय. बोईंग स्टारलाइनरनं 5 जून रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन अंतराळात उड्डाण केलं होतं. ते एका आठवड्यात परतणार होते, पण स्पेसशिपमधील हेलियम लीक आणि थ्रस्टरमधील खराबीमुळं ते पृथ्वीवर परत येऊ शकले नाही. याबाबत नासानं आता माहिती दिलीय. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेस स्टेशनवरच राहावं लागणार आहे.
"स्टारलाइनर अंतराळ यान पृथ्वीवर परत येणार आहे. हे ह्यूस्टनमधील स्टारलाइनर मिशन कंट्रोल आणि फ्लोरिडातील बोईंग मिशन कंट्रोल सेंटरमधील फ्लाइट कंट्रोलर्सद्वारे व्यवस्थापित केलं जाईल. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून अनडॉक केल्यानंतर, यानाला न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बर येथे उतरेल".- नासा
स्टारलाइनरचं मोठं नुकसान : अंतराळत गेल्यानंतर बोइंग स्टारलाइनरचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं त्याची दुरुस्तीसह डिझाइन करण्यासाठी कंपनीला मोठा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. कंपनीनं आधीच स्टारलाइनर सुमारे 1.5 अब्ज डॉलर खर्च झाल्याचं सांगितलंय. नासाच्या स्पेस ऑपरेशन्स मिशन डायरेक्टरेटचे सहाय्यक प्रशासक केन बोवर्सॉक्स यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की, 'आम्हाला बोईंग स्टारलाइनर चाचणी, त्याचं उड्डाण सर्व क्रूसह पूर्ण करायचं होतं. मात्र, तसं न झाल्यानं आम्ही निराश आहोत.