वॉशिंग्टन Boeing Starliner returned to Earth : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळात घेऊन जाणारं बोईंगचं स्टारलाइनर यानं आज पृथ्वीवर परतलं. शनिवारी सकाळी (शुक्रवारी रात्री यूएस वेळेनुसार) न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बरवर यानानं सुरक्षित लँडिंग केलं. अमेरिकन अंतराळ संस्था नासानं ही माहिती दिली आहे. मात्र, हे यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळातच सोडून पृथ्वीवर परतलं. स्टारलाइनरसोबत गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) राहतील. स्पेसशिपमधील धोका लक्षात घेता, नासानं स्टारलाइनर कॅप्सूलमधून दोन्ही अंतराळवीरांना परत न आणण्याचा निर्णय घेतला होता.
#Starliner has undocked from the @Space_Station and will begin its journey back to Earth.@NASA and @BoeingSpace are targeting approx. 12am ET Sept. 7 for the landing and conclusion of the Crew Flight Test mission at the White Sands Space Harbor, New Mexico landing site. pic.twitter.com/uB0DgmUUPW
— NASA Commercial Crew (@Commercial_Crew) September 6, 2024
सुरक्षित लँडिंग : अमेरिकेच्या वेळेनुसार शनिवारी सकाळी 12:01 वाजता कॅप्सूलचं अधिकृत लँडिंग झाल्याचं नासानं सांगितल. योजनेनुसार, यानाचे तीनही मोठे पॅराशूट उघडल्यामुळं लँडिंग सोपं झालं. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळयान सुरक्षितपणे पृथ्वीर परतल्याबद्दल नासाच्या ग्राउंड कंट्रोलर्सचं अभिनंदन केलंय. "स्टारलाइनरनं पुन्हा एकदा स्वतःला अंतराळ प्रवासासाठी सुरक्षित असल्याचं सिद्ध केलं आहे, असं नासानं म्हटलं आहे.
.@BoeingSpace’s #Starliner touched down safely in White Sands Space Harbor, New Mexico, at 12:01am ET Sept. 7, concluding the Crew Flight Test. Recovery teams are now beginning work to retrieve Starliner for return to facilities at @NASAKennedy.
— NASA Commercial Crew (@Commercial_Crew) September 7, 2024
Tune in for the post-landing news… pic.twitter.com/LJLM4aBneo
समुद्राऐवजी जमिनीवर उतरवलं : बोइंग स्टारलाइनर कॅप्सूल स्पेस स्टेशनवरून अनडॉक केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकन वेळेनुसार 6:04 वाजता पृथ्वीच्या दिशेनं झेपावलं. स्पेसशिपमध्ये एकही क्रू नव्हता, म्हणून ते स्वायत्त मोडवर पृथ्वीच्या दिशेनं येतं होतं. बोइंगच्या लँडिंगची खास गोष्ट म्हणजे, ते स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन, नासाच्या मर्क्युरी प्रोग्राम कॅप्सूलप्रमाणं समुद्रात उतरले नाही. स्टारलाइनर जमिनीवर उतरलंय. स्टारलाइनसाठी पाच संभाव्य लँडिंग साइट्स तयार होत्या. दोन न्यू मेक्सिकोमध्ये, एक युटामध्ये, एक ऍरिझोनामध्ये आणि शेवटी एक कॅलिफोर्नियामध्ये. कॅप्सूलनं व्हाईट सँड्स स्पेस हार्बर, न्यू मेक्सिकोवर उतरण्याचा निर्णय घेतला. या फील्डचा वापर पूर्वी नासाच्या स्पेस शटल वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात होता.
सहा तासात पृथ्वीवर पोहोचलं : स्टारलाइनरला अंतराळातून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सहा तास लागले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूट उघडण्यात आले. शेवटी, तीन पॅराशूटच्या मदतीनं, जमिनीवर त्याचं सॉफ्ट लँडिंग केलं. कोणत्याही अडथळ्याशिवाय ते पृथ्वीवर परतलंय. अमेरिकेच्या वेळेनुसार शुक्रवारी रात्री 11 वाजता या यानानं ताशी 27,400 किमी वेगानं पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला. सुमारे 45 मिनिटांनंतर त्याने आपला वेग कमी करण्यासाठी पॅराशूट उघडलं. न्यू मेक्सिकोच्या वाळवंटातील व्हाईट सँड्स स्पेस हार्बरवर लँडिंगच्या काही वेळापूर्वीच यांनी पॅराशूट ओपन केलं. त्यानंतर ते सुरक्षित लॅंड झालं.
हे वाचलंत का :