ETV Bharat / technology

ASUS ROG 9 आणि ROG 9 प्रो फोन लॉन्च : किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या - ASUS ROG 9 AND ROG 9 PRO PHONE

ASUS ROG 9 and ROG 9 Pro Phone Launch: Asus नं आपली नवीन ROG फोन 9 मालिका लॉंच केली आहे. याफोनमध्ये उत्कृष्ट फीचर मिळताय.

Asus ROG Phone 9, ROG Phone 9 Pro Phone
ASUS ROG 9 आणि ROG 9 प्रो फोन (ASUS)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 20, 2024, 9:41 AM IST

हैदराबाद ASUS ROG 9 and ROG 9 Pro Phone Launch : Asus नं आपली नवीन ROG Phone 9 सीरीज लॉंच केली आहे. यात गेमिंग स्मार्टफोनसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मालिकेतील फोन 6.78-इंच FHD + 185Hz AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि IP68 रेटिंगसह येतात. चला जाणून घेऊया दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत आणि फीचर्स.

ASUS ROG 9 फोन मालिकेची वैशिष्ट्ये : नवीन मोबाइल फोनमध्ये 57% मोठी ग्रेफाइट शीट आणि नवीन सक्रिय कुलर आहे. गेमर्ससाठी, AeroActive Cooler X Pro मध्ये सबवूफर आणि दोन अतिरिक्त शोल्डर बटणे देखील आहेत, ज्यामुळं गेम खेळताना नियंत्रण सोपं होतं. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर, 1-120Hz LTPO तंत्रज्ञानासह येते आणि गेमिंगसाठी 185Hz रिफ्रेश दर मिळतोय. याशिवाय 2 हाजार 500 nits ब्राइटनेस आणि गोरिला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण फोनला मजबूत आणि टिकाऊ बनवतं.

पॉवरिंगसाठी 5800mAh बॅटरी : दोन्ही उपकरणे स्नॅपड्रॅगन 8 एलिट SoC प्रोसेसरसह येतात. त्यात 12GB ते 24GB LPDDR5X रॅमचा समावेश आहे. वापरकर्त्यांना 256GB ते 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळतात. फोनला पॉवरिंगसाठी 5800mAh बॅटरी मिळतेय. जी 65W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा फ्रंटवर, या लाइनअपमध्ये ROG Phone 9 Pro मध्ये 50MP मुख्य लेन्स, 13MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 32MP टेलिफोटो लेन्स आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीनं तुम्ही उत्तम छायाचित्रण करू शकता.

ASUS ROG Phone 9 आणि ROG Phone 9 Pro ची किंमत : ROG Phone 9 ची किंमत भारतात सुमारे 84 हजार 432 रुपयांपासून सुरू होते, तर ROG Phone 9 Pro चे बेस व्हेरिएंट Rs 1 लाख 1 हजार 320 मध्ये उपलब्ध आहे. प्रो एडिशन (24GB + 1TB) Rs 1 लाख 26 हजार 650 ला लॉंच करण्यात आलंय. ही मालिका सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये उपलब्ध आहे, मात्र भारतात लॉंच करण्याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

हे वाचलंत का :

  1. Redmi Note 14 मालिकेचा टीझर रिलीज,लवकरच भारतात होणार लाँच
  2. मतदान कार्ड हरवलंय?, 'हे' 12 प्रकारचे पुरावे दाखवून करा मतदान
  3. Redmi K80, K80 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक, कधी होणार लॉंच?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.