हैदराबाद Google internship 2025 : गुगलमध्ये नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्हालाही गुगलसोबत तुमचं करिअर सुरू करायचं असेल, तर कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. Google नं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विंटर इंटर्न 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इंटर्नशिप जानेवारी 2025 पासून सुरू होईल. या इंटर्नशिपचा कालावधी 22 ते 24 आठवडे असेल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासून अर्ज करावे.
इंटर्नशिपसाठी कोण करू शकतो अर्ज : या इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी अंतिम वर्षात शिकत असला पाहिजे. C, C++, Java, JavaScript, Python किंवा त्याच्या समकक्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंगचा अनुभव यासाठी लगणार असावा. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
इंटर्नशिपसाठी कसा करावा अर्ज : Google इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत पोर्टलवर (https://buildyourfuture.withgoogle.com/internships) जावं लागेल. इथं तुम्हाला Apply ची लिंक दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. यानंतर, आवश्यक तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अर्जासोबत, तुम्ही तुमचा सीव्ही देणं आवश्यक आहे.
गुगल इंटर्नशिप स्किल्स : गुगलमध्ये इंटर्नशिपसाठी करण्यासाठी तुमच्याकडं काही पात्रता असणं आवश्यक आहे. यापैकी काहींमध्ये कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, युनिक्स/लिनक्स, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग, नेटवर्किंग आदी अनुभव विद्यार्थ्यांकडं असायला हवे.
किती मिळणार मानधन : Google इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना चांगले मानधन दिलं जातं. गुगलमध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांना 60-70 हजार रुपये दरमहा ऑफरही दिली जाते. Google मधील वेतन तुमच्या कामासह प्रोफाइलवर अवलंबून असते. गुगलवर इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांचं पॅकेज 10.6 लाख ते 16.8 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
हे वाचंलत का :
- गुगलनं युजर्ससाठी लाँच केलं 'हे' अप्रतिम फीचर, जाणून घ्या काय आहे खास - Google Gemini Live Feature Launch
- इंधन भरताना पेट्रोल पंपावर '0' दाखवून 'असा' लागतो तुम्हाला चुना, 'या' ट्रीक वापरून टाळा फसणूक - Petrol pumps Fraud
- T20 महिला क्रिकेट विश्वचषक आजपासून सुरु; गुगलनं बनवलं अप्रतिम 'डूडल' - ICC Womens T20 World Cup