ETV Bharat / technology

Apple iPhone 17 पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता, काय असतील बदल? - APPLE IPHONE 17

Apple iPhone 17 पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. Apple iPhone 17 शी संबंधित डिझाइनपासून ते फीचर्सपर्यंत मोठे बदल होतील.

Apple
प्रातिनिधिक फोटो (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 14, 2024, 7:28 PM IST

हैदराबाद : ॲपलच्या आगामी आयफोन 17 बद्दल बातम्या येऊ लागल्या आहेत. या मालिकेबाबत सर्वात मोठी अपडेट म्हणजे प्लस व्हेरिएंट लाँच करण्याऐवजी, कंपनी एक नवीन स्लिम/एअर मॉडेल लाँच करू शकते. यासोबतच, कंपनी नेक्स्ट जेन मालिकेत एआयची व्याप्ती वाढवू शकते. त्यात काही मोठे बदल देखील पाहिले जाऊ शकतात.

आयफोन 17 ची डिझाइन : आयफोन 17 मालिकेत पूर्णपणे नवीन कॅमेरा सेटअप मिळेल. त्याची डिझाइन 16 मालिकेपेक्षा खूपच स्लिम असेल. यासोबतच, कंपनी या मालिकेसाठी एकंदर नवीन डिझाइन आणण्याची योजना आखत आहे. फेस आयडी सेन्सरस्कॅन देखील यामध्ये देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. ॲपलच्या पुढील मालिकेची रचना मागील आयफोनपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल.

ॲल्युमिनियम बॉडी : सिरीजचा टॉप-एंड मॉडेल, आयफोन १७ प्रो मॅक्स, डायनॅमिक आयलंडसह येण्याची शक्यता आहे. प्रो मॉडेल्स टायटॅनियम बॉडीऐवजी ॲल्युमिनियम बॉडीसह येऊ शकतो. काही अहवालांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, सध्या, या मालिकेबद्दल फारसे अपडेट्स नाहीत, त्यामुळं हा अहवाल अचूक मानला जाऊ शकत नाहीत.

कधी होणार लाँच? : ॲपलच्या मालिकेबद्दल काही महिने आधीच तपशीलांची माहिती ऑनलाइन येण्याची शक्यता आहे. अलीकडेच आयफोन 16 मालिका लॉंच झालीय, तर आयफोन 17 बद्दलची माहिती त्यानंतर लगेचच येऊ लागली. त्याच्या लाँचबद्दल बोलायचं झालं तर त्यासाठी अजूनही वेळ आहे. हा फोन पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. याआधी, कंपनी इतर अनेक उपकरणे लाँच करू शकते.

हे वाचंलत का :

  1. दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील 'हे' सर्वोत्तम 5जी स्मार्टफोन
  2. Redmi Note 14 5G सीरीजचा सेल सुरू, जबरदस्त सवलतीच्या ऑफरचाही घ्या लाभ..
  3. PHANTOM V2 फोल्डेबल सीरीजचा सेल सुरू, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.