नवी दिल्ली 2024 Classic 350 : Royal Enfield नं भारतीय बाजारात 2024 Classic 350 दमदार दुचाकी लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत रु. 1.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. तर त्याच्या टॉप-एंड आवृत्तीची किंमत 2.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. अद्ययावत दुचाकीला नवीन रंग, अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. नवीन 2024 Royal Enfield Classic 350 चं बुकिंग सुरू झालंय.
Royal Enfield मध्ये काय नवीन : Royal Enfield नं पाच प्रकारांमध्ये सात नवीन रंगसंगती असलेल्या दुचाकी लॉंच केल्या आहेत. ज्यात हेरिटेज (मद्रास रेड आणि जोधपूर ब्लू), हेरिटेज प्रीमियम (मेडलियन ब्रॉन्झ), सिग्नल (कमांडो सँड), गडद (गन ग्रे आणि स्टेल्थ ब्लॅक) आणि क्रोम (एमराल्ड) सारख्या रंगांचा समावेश आहे.
नवीन फिचर : नवीन Royal Enfield Classic 350 मध्ये अनेक कार्यक्षम वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये LED हेडलॅम्प, एक LED पायलट लाईट, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरील गियर पोझिशन इंडिकेटर आणि टाइप C USB चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. या सर्व वैशिष्ट्यांसह, ही बाईक तिचं विशेष सौंदर्य आणि वैशिष्ट्यासह बाजारात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, प्रीमियम प्रकार, एमराल्ड आणि डार्क सीरीज, ट्रिपर पॉड्ससह, लीव्हर्स आणि एलईडी टर्न सिग्नलसह Royal Enfield Classic 350 सुसज्ज आहे.
विशेष ऑफर : Royal Enfield ब्रँडनं यासाठी विशेष ऑफरही जाहीर केली आहे. जे ग्राहक 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान नवीन क्लासिक 350 बुक करतील त्यांना रॉयल एनफिल्डच्या उत्पादन सुविधांना भेट देण्यासाठी संधी असेल. तसंच दुचाकीच्या डिझाइनवर काम करण्यासाठी चेन्नईची सहल जिंकण्याची संधी देखील मिळेल.
इंजिन शक्ती : पॉवरट्रेन पर्यायांबद्दल बोलायचx झाल्यास, 2024 Royal Enfield Classic 350 मध्ये कोणताही बदल नाही. 2021 मध्ये या बाईकवर सादर करण्यात आलेलं 349cc, सिंगल सिलिंडर J-सिरीज इंजिन याला मिळतं. हे इंजिन 6,100 rpm वर 20.2 hp ची पॉवर आणि 4,000 rpm वर 27 Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सला जोडलेलं आहे.
ब्रेकिंग आणि सस्पेन्शन : सध्याच्या मॉडेलमधून ब्रेकिंग आणि सस्पेन्शनही घेतलं आहे. यामध्ये पुढील बाजूस 41mm टेलिस्कोपिक फोर्कसह ड्युअल क्रॅडल फ्रेम आणि मागील बाजूस प्री-लोड डजस्टेबल ट्विन शॉकचा समावेश आहे. समोर 300 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 270 मिमी डिस्कद्वारे ब्रेकिंग केलं जातं. हे सिंगल चॅनल आणि ड्युअल चॅनल एबीएस या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध असेल. ही दुचाकी 19-इंच पुढच्या आणि 18-इंच मागील चाकांसह उपलब्ध आहे. जरी अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर फक्त वरच्या व्हेरियंटपुरतं मर्यादित आहे.
हे वाचलंत का :
इलेक्ट्रिक वाहनावर 10 हजारांची सूट, 'ही' आहे शेवटची तारीख - Discount on Electric Scooters