ETV Bharat / state

शरद पवारांना केंद्राची Z+ सुरक्षा; नेमके कारण काय? - Sharad Pawar Z Plus Security

Sharad Pawar Z Plus Security : शरद पवार यांना केंद्र सरकारनं झेड प्लस सुरक्षा दिलीय. केंद्रीय गृहखात्यानं पवारांना दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. यापुढं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान पवार यांना सुरक्षा पुरवतील. झेड प्लस सुरक्षा देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते.

Sharad Pawar
शरद पवार (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 4:47 PM IST

मुंबई : येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारनं ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान केली आहे. पवारांना मिळत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहखात्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सध्या शरद पवार यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा आहे. केंद्रानं शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या.

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा : केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास सांगितलं आहे. शरद पवार हे देशातील महत्वाचे नेते आहेत. या कामासाठी 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. ते शरद पवार यांच्या ताफ्यात तैनात असणार आहेत.

का दिली झेड प्लस सुरक्षा : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यातील जनतेनं पाठिंबा दिला होता. येत्या 2-3 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात राजकीय नेत्यांबद्दल नाराजी आहे. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या कार्यालयात सुरक्षा चाचपणी केली होती. त्यामुळं राज्यातील घडामोडी पाहता केंद्र सरकारनं त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा केली.

सुरक्षेचा निर्णय केंद्र सरकारच्या समितीनं घेतला आहे. यात मला सध्या कोणतेही राजकारण दिसत नाही. शरद पवारांचा राजकीय दबदबा दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारनं निर्णय घेतला असावा. - रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)

  • मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान उठवलं. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या उपोषणस्थळाला भेट दिली होती. त्यावेळी आंदोलकांनी शरद पवार यांना काळे झेंडे दाखवले होते. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण चिघळू शकतं, अस बोललं जातय. तसंच दिल्लीत शरद पवार यांच्यावर एका तरुणानं हल्ला केला होता. सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही पक्ष सध्या आपापल्या पक्षांना बळकट करण्यासाठी दौरे करत आहेत. त्यामुळं पवार देखील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आल्याची चर्चा आहे.

कळ काढली की सुरक्षा मिळते? : भाजपाचे माजी खासदार नीलेश राणे यांनी 'X'वर झेड प्लस सुरक्षेवरून शरद पवार निशाना साधला आहे. शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. सीआरपीएफचे 55 जवान त्यांचं संरक्षण करतील. त्यांना कोण मारणार, कोणाकडून धमक्या दिल्या जात आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण बातमी वाचल्यानंतर वाटलं की पन्नास वर्षे देशात आणि राज्यात कळ काढत बसलं, तरी झेड प्लस संरक्षण मिळते की काय? असा मिश्किल सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

गृहमंत्र्यांना सुरक्षा काढून घेण्यास सांगा : शरद पवार यांना केंद्रानं झेड प्लस सुरक्षा दिल्यानं भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यार 'X' या सोशल माध्यमातून टीका केलीय. त्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. मला आठवण करून दिली की त्यांचे वडीलही केंद्राच्या सुरक्षेत आहेत. निलेश राणेंच्या वडिलांनाही अशी सुरक्षा आहे. मग त्यांची सुरक्षा काढून घ्यायला हवी का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर तुमचा विश्वास नाही का, असा टोला त्यांनी राणेंना लगावला आहे. त्यामुळं तुम्ही केंद्राला पत्र लिहून महाराष्ट्रातील नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याची विनंती सरकारला करावी. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल तुम्ही अशी भाषा वापरता, तुम्हाला हे शोभा देत नाही. तसंच राज्याचे गृहमंत्री फडणवीस यावर तोंड बंद करुन बसताय, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

X,Y,Z,Z+ सुरक्षा म्हणजे नेमकं काय : एखाद्या व्यक्तीच्या जीवितास संभाव्य धोका असल्यास त्यांना सुरक्षा प्रदान केली जाते. त्यानुसार अभ्यास करून, X, Y, Z, आणि Z+ सुरक्षा श्रेणींपैकी कोणती सुरक्षा प्रदान करायची हे ठरवलं जातं. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा द्यायची असल्यास, महाराष्ट्र राज्यात तज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ती समिती राज्य सरकारला अहवाल सादर करते. त्यानंतर सरकारकडून सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. राज्य आणि देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना Z, Z Plus श्रेणीची सुरक्षा दिली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संभाव्य नेत्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येते. या श्रेणीमध्ये एक बुलेटप्रूफ वाहन आणि दोन एस्कॉर्ट वाहनांचा समावेश आहे. 55 प्रशिक्षित पोलीस कर्मचारी आणि दहाहून अधिक कमांडो 24 तास त्यांच्या सुरक्षेत तैनात असतात. हे कमांडो मार्शल आर्टमध्ये निपुण असतात. त्यांच्याकडं अद्ययावत शस्त्रेही असतात.

'हे' वाचलंत का :

  1. तर जनतेचा उद्रेक होणारच, महाराष्ट्र बंद राजकीय नाही : उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, महाराष्ट्र बंदची हाक - Uddhav Thackeray On Badlapur Case
  2. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट - Maharashtra politics
  3. "यांच्याकडे आपण लक्ष देत नाही...", शिंदेंच्या आमदाराला अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर - Ajit Pawar On Mahendra Thorve

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.