ETV Bharat / state

पुणे तिथे काय उणे... एक पठ्ठ्या फांद्या कापायला चढला आणि झाडावर आणि तिथेच अडकला - Youth Rescue In Tree - YOUTH RESCUE IN TREE

Youth Rescue In Tree : पुण्यात झाडाच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी एक इसम झाडावर चढला; परंतु 30 ते 35 फूट उंचीवर चढल्यानंतर तो तिथेच अडकून पडला. अखेर अग्निशामक दलाच्या मदतीने त्या इसमास खाली उतरविण्यात आलं. दरम्यान, हा युवक किरकोळ जखमी झाल्यानं त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Youth Rescue In Tree
अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 9:59 PM IST

झाडावर चढलेल्या युवकाला खाली उतरविण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान (Reporter)

पुणे Youth Rescue In Tree : 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण नेहमीच म्हटली जाते आणि याचा अनुभव विविध माध्यमातून पुण्यात येतच असतो. (youth injured coming down from tree) पुण्यातील वानवडी परिसरात एक अशीच घटना घडली आहे. झाडाच्या फांद्या तोडायला चढलेली व्यक्ती झाडावरच अडकली आणि अशा या पठ्ठ्याला झाडावरून उतरवण्यासाठी चक्क अग्निशामक दलाला बोलवण्यात आलं. (Cooperation of fire brigade)

फोन येताच तातडीने वाहने रवाना : आज (22 मे) सकाळच्या वेळेस अग्निशमन दल नियंत्रण कक्षात एक इसम झाडावर अडकला असून मदतीची मागणी करत असल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाकडून कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन तसंच मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन आणि उंच शिडीचे ब्रॉन्टो वाहन अशी एकूण तीन वाहने रवाना करण्यात आली होती.

अडकलेल्या व्यक्तीची अशाप्रकारे केली मदत : घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, त्या ठिकाणी एका उंच झाडावर सुमारे तीस ते पस्तीस फुट उंचीवर एक इसम अडकलेल्या अवस्थेत आहे. तो मदतीकरिता मागणी करत असल्याचे पाहताच तातडीने झाडाला शिडी लावून जवान झाडावर चढत त्याठिकाणी पोहोचले. तेथे तो इसम अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असल्याचं जाणवलं. जवानांनी प्रथम त्याच्याशी संवाद साधत "आम्ही आलो आहोत, तुम्ही काळजी करू नका" असं सांगत धीर दिला आणि तिथे आजुबाजूला असणाऱ्या फांद्या "ट्रि प्रुनर" या उपकरणाने छाटून त्याच्या जवळ जाऊन दोरीचा उपयोग करत सुमारे पंधरा मिनिटात त्याला सुखरुप खाली उतरवलं. अडकलेला इसम रामा पवार (वय २८, रा. वानवडी) यांनी व स्थानिकांनी जवानांचे आभार मानले.

त्या व्यक्तीला रुग्णालयात केले दाखल : या घटनेत रामा पवार हे किरकोळ स्वरूपात जखमी असल्यानं आणि ते घाबरलेल्या परिस्थितीत असल्यानं त्यांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात रवाना करण्यात आलं. अडकलेला इसम हा झाडाच्या फांद्याची छाटणी करण्याकरिता वर चढला होता.

हेही वाचा :

  1. विशाल अग्रवाल यांनी वडील म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी - Asim Sarode Blames Vishal Agarwal
  2. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी - pune porsche accident update
  3. फळांमध्ये फूल; धार्मिक महत्त्व, प्राणवायूचा खजिना असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली भरपूर पाणीसाठा - Properties Of Udumbara Tree

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.