मुंबई Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मोठी कारवाई केलीय. मुख्य आरोपी मिहिर शाहनं कथितरित्या दारू घेतलेल्या जुहूमधील बारचं अनधिकृत बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात आलं. व्हाईस ग्लोबल तपस बार असं कारवाई करण्यात आलेल्या बारचं नाव आहे.
#WATCH | Mumbai: Illegal portion of the bar in Juhu where Worli hit and run case accused went before the accident, is being demolished by BMC. pic.twitter.com/JwykktZGbS
— ANI (@ANI) July 10, 2024
नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई : मुख्य आरोपी मिहिर शाह याने भरधाव वेगानं बीएमडब्ल्यू चालवून दुचाकीला धडक दिल्यानं कावेरी नाखवा (45) यांचा मृत्यू झाला. मिहिर शाहला पोलिसांनी विरारमधून मंगळवारी अटक केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बीएमसीच्या के-पश्चिम प्रभाग कार्यालयाचं पथक आज सकाळी व्हाइस-ग्लोबल तापस बारमध्ये पोहोचलं. त्यांनी बारच्या अनधिकृत असलेल्या बांधकामाचा काही हिस्सा बुलडोझरनं पाडला आहे. नियमांचं उल्लंघन करुन बारचं बांधकाम वाढवण्यात आलं होतं. अनधिकृत बांधकाम पाडण्यापूर्वी बारला नोटीस देण्यात आली होती. यापूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागानं या बारला सील ठोकलं होतं. नियमानुसार दारू पिण्याकरिता परवाना लागतो. त्यासाठी किमान 25 वर्षे वयाची अट आहे. आरोपी मिहिरचे वय 24 वर्षांहून कमी असताना त्याला दारू दिल्यानं बार सील केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. बार चालकानं नियमांचं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं.
मुख्य आरोपीला अटक : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई करत आरोपी मिहिर शाह याला मुंबईतून अटक केली. आरोपी मिहिर शाह अपघात घडल्यानंतर फरार झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केलीय. या 12 जणांना शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. या 12 जणांमध्ये मिहिर शाहची आई आणि बहिणीचादेखील समावेश आहे. या 12 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मिहीर शाह याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :