मुंबई - अटक बेकायदा असल्यानं न्यायालयानं आपली तातडीनं मुक्तता करावी, अशी वरळी येथील बीएमडब्ल्यू हिट अँड रन केसमधील मुख्य आरोपी मिहीर शाह यानं मुंबई उच्च न्यायालयाकडं विनंती केली आहे. बुधवारी मिहीर शाहच्या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सात जुलैला मिहीर शाहच्या बीएमडब्ल्यू गाडीनं दुचाकीला धडक देऊन फरफत नेले होते. त्यामध्ये कावेरी नाखवा या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन दिवसानंतर फरार मिहीरला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कोठडीत आहे. मात्र ही अटक बेकायदा असल्याचं सांगत मुक्तता करण्याची मागणी त्यानं याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
दोन दिवस होता फरार- 24 वर्षीय मिहीरनं त्याच्या ताब्यातील बीएमडब्ल्यूची धडक दुचाकीला दिल्यानं कावेरी नाखवा हिच्या मृत्यूस तो कारणीभूत झाला होता. धडक बसल्यानंतर नाखवा या बोनेटवर उडून पुन्हा खाली पडल्या होत्या. मात्र, मिहीरनं त्यांना फरफटत दीड किलोमीटर अंतरापर्यंत नेले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मिहीर मुलगा असून अपघातानंतर दोन दिवस फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत अटक केली. मात्र, ही अटक बेकायदा असल्याचा दावा करत शाहातर्फे उच्च न्यायालयात हेबीयएस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे.
नेमकी काय घडली होती घटना? अपघातावेळी मिहीरनं मद्यप्राशन केल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, दोन दिवस फरार असल्यानं त्याच्या अटकेनंतरच त्याची चाचणी घेण्यात आली. या अपघात प्रकरणी त्याच्या सोबत वाहनात असलेला राजरुषी बिडावत आणि मिहीरचे वडील राजेश शाह यांनादेखील अटक करण्यात आली होती. न्यायालयानं त्याच्या वडिलांना जामीन दिला. मात्र, हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. वरळी हिट अँड प्रकरणावरून शिवसेनेवर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी केली होती.
- मिहीर शाहनं अपघातावेळी मद्यप्राशन केले होते का? हे तपासण्याकरिता पोलिसांनी त्याचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठविले होते. हा फॉरेन्सिक अहवाल 8 ऑगस्टला वरळी पोलिसांना प्राप्त झाला. यामध्ये तो निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली होती. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील
हेही वाचा-