पुणे Womens Day 2024 : जागतिक महिला दिनानिमित्त देशभरातील अनेक महिला ज्यांनी महिलांसाठी तसंच विविध क्षेत्रात आपल्या ठसा उमटवलेलं आपण पाहिलंय, असं असताना पुण्यात गेल्या 23 वर्षांपासून अत्याचारी महिला, कौटुंबिक प्रकरणं अशा विविध प्रकरणात कायदेतज्ञ रमा सरोदे हे काम करत असून अनेक महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिलाय. काही तर असे प्रकरणे आहे ज्यात कायदेशीर मदतीसह आर्थिक मदत तसंच मोफत कायदेशीर लढाई सरोदे यांनी केल्या आहेत.
23 वर्षांपासून सुरु आहे कायदेशीर लढाई : आज 21 व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन महिला काम करत आहेत. आपण दरोरोज महिलांच्या अनेक प्रश्नाबाबत ऐकत असतो वाचत असतो. पण कौटुंबिक हिंसाचार बाबतच्या घटना या आपल्याला दररोज पाहायला मिळतात. अशा या महिलांसाठी गेल्या 23 वर्षांपासून कायदेशीर लढाई रमा सरोदे देत आहेत. महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत रमा सरोदे म्हणाल्या की, "महिलांच्या प्रश्न अनेक आहे. कुटुंबातील तसंच कुटुंबाच्या बाहेरचं तसंच मानसिक आरोग्य, महिला सुरक्षितता, लैंगिक छळ, समाजात वावरत असताना महिलांना मिळणारी वागणूक असे अनेक महिलांचे प्रश्न असून महिलांच्या या प्रश्नावर आम्ही कायदेशीर काम करत आहोत. महिलांच्या बरोबर पुरुषांचं देखील काम करत असताना महिलांच्या पर अन्याय होणार नाही याची देखील पुरेपूर खबरदारी आम्ही घेत असतो."
कौटुंबिक हिंसाचार मोठा प्रश्न : महिलांचे अनेक प्रश्न असून सर्वात मोठा प्रश्न कौटुंबिक हिंसाचारच आहे. आज सर्वाधिक प्रश्न हे कौटुंबिक हिंसाचाराचे असून यात अनेक महिलांना वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागतो. एका महिलेला देखील 7 ते 8 वर्ष संघर्ष करावं लागलंय. पीडित महिलेचं लग्न हे परदेशात झालं आणि तिचा नवरा हा परदेशात मोठ्या पदावर होता. लग्न झाल्यावर मुलं देखील झाली आणि नंतर पतीचं एका महिलेशी प्रेम प्रकरणं जुडलं आणि तो पत्नीला त्रास देऊ लागला. त्रास सहन होऊ न लागल्यानं पीडित तरुणी ही भारतात आली आणि ती भावाजवळ राहू लागली. पती मोठा अधिकारी असल्यानं त्याला काहीच वाटू लागलं नाही. त्या वेळेस कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा देखील नव्हता जवळपास 4 ते 5 वर्ष ही महिला तारीख पे तारीख मिळत असल्यानं संघर्ष करु लागली आणि तेव्हा रमा सरोदे यांनी तिला कायदेशीर मदत करत न्याय मिळवून दिला.
स्वखर्चानं देतात कायदेशीर लढा : महिलांच्या अनेक प्रश्नांवर सरोदे या काम करत असून एका प्रकरणात तर एका महिलेचा घटस्फोट झाला आणि ती महिला वेगळी राहू लागली तेव्हा तिचं एका माणसाबरोबर प्रेम प्रकरण जुळलं आणि हे प्रेम प्रकरण जुळल्यानंतर त्या महिलेला कळाल की संबंधित व्यक्तीचं लग्न झालंय आणि लग्न झालेलं असताना देखील हे दोघं एकत्र राहू लागले. मात्र जेव्हा त्या व्यक्तीच्या घरी कळालं तेव्हा त्या पिडीत महिलेला एक मुलगा देखील झालेला होता आणि तो खूपच छोटा होता अशा घटनेत सरोदे यांनी कायदेशीर बाबी समजून घेत त्या पुरुषाला आणि महिलेला बोलून महिलेला न्याय मिळवून दिला आहे. महिलांच्या प्रश्नांवर समाजात आज अनेक लोक काम करत आहेत. असं असताना गेली 23 वर्ष रमा सरोदे हे महिलांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. वकिली व्यवसाय करत असताना महिलांच्या प्रश्नांवर प्रामुख्यानं त्या काम करत आहेत. तसंच वेळ पडली तर स्वखर्चानं आणि मोफत देखील महिलांच्या प्रश्नावर कायदेशीर लढा त्या देतात.
हेही वाचा :