ETV Bharat / state

Womens Day 2024: सायबर क्राईमपासून महिलांचा बचाव करण्यासाठी धडपडतेय 'रणरागिणी' - International Women Day 2024

International Women Day 2024 : मुंबईत वाढत्या सायबर क्राईमच्या घटनांनी अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मात्र साबर गुन्हेगारी रोखण्यासाठी भायखळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांनी महिलांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.

International Women Day 2024
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 7:14 AM IST

Updated : Mar 8, 2024, 12:00 PM IST

सायबर क्राईमपासून महिलांचा बचाव करण्यासाठी धडपडतेय 'रणरागिणी'

मुंबई International Women Day 2024 : मायानगरी मुंबईत सायबर क्राईम गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळं महिलांनी सायबर क्राईमला बळी पडून नये, म्हणून मंजुषा परब या वरिष्ठ पोलीस निरीक्षक धडपड करत आहेत. मंजुषा परब या भायखळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 'खाकी वर्दीचा अभिमान वाटतो' असं त्यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. "महिलांनी 30 टक्के आरक्षणाचा फायदा घेऊन पोलीस दलात सहभाग वाढवावा' अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजुषा परब या 1992 पासून काळाचौकी-लालबाग परिसरात राहतात. अतिशय सक्षम आणि निर्भीडपणे मंजुषा परब या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पडतात.

थोरल्या बहिणीनं दिली प्रेरणा : मंजुषा परब या पोलीस अधिकारी महिलेला त्यांच्या थोरल्या बहिणीनं पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रेरित केलं. मंजुषा परब यांची थोरली बहीण 1989 यावर्षी एमपीएससी परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदी पोलीस दलात भरती झाल्या होत्या. गेल्या वर्षी त्या सेवानिवृत्त झाल्याची माहिती मंजुषा परब यांनी दिली. "आपल्या थोरल्या बहिणीनं आपल्याला पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रेरणा दिली," अशी माहिती पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांनी दिली आहे. मंजुषा परब या 1995 मध्ये पोलीस दलात दाखल झाल्या. त्या गेली अनेक वर्ष आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होत्या. गेल्या नऊ महिन्यांपासून मंजुषा परब या भायखळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. मिश्रित वस्ती असलेल्या भायखळा परिसरात चांगल्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था मंजुषा परब राखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सायबर क्राईमला बळी न पडण्यासाठी ही घ्यावी काळजी : जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी म्हणून मंजुषा परब यांनी समस्त महिला वर्गाला आवाहन करताना केलं आहे. "गेल्या काही वर्षांपासून सायबर क्राईमनं डोके वर काढलं असून मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत. त्यामुळं सायबर क्राईमला बळी पडायचं नसेल, तर मोबाईलवर येणाऱ्या अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, तसेच ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क रहावं. त्याचप्रमाणं आपली खासगी माहिती मोबाईलद्वारे अथवा सोशल मीडियाद्वारे कोणालाही शेअर करू नये. सायबर क्राईममध्ये पैशाचं नुकसान झाल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा."

हेही वाचा :

  1. मुंबई पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या लेटरबॉम्ब प्रकणाला वेगळं वळण, २ पोलीस कॉन्स्टेबलसह एका व्यक्तीचा सहभाग
  2. बायकोसाठी कायपण! मुंबई विमानतळावर घडलेला प्रकार ऐकून डोकं चक्रावेल, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Last Updated : Mar 8, 2024, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.