ETV Bharat / state

जन्माला आला मुलगा, मात्र डिस्चार्जवेळी हातात सोपवली मुलगी; नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ

नाशिक जिल्हा रुग्णालयात एका गर्भवती महिलेला मुलगा झाला होता. पण रुग्णालयातून डिस्चार्ज देतेवेळी हातात मुलगी देण्यात आली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

CHILD CHANGE IN NASHIK HOSPITAL
रुग्णालयात बाळाची अदलाबदल (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2024, 8:12 PM IST

Updated : Oct 16, 2024, 8:47 PM IST

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गरोदर महिलेला मुलगा झाला होता. पण डिस्चार्ज देत असताना हातात मुलगी देण्यात आल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बाळाचा स्वीकार करण्यास नाकार दिला. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबत समिती गठीत करत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय? : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळं चर्चेत असतं. आता या रुग्णालयात चक्क बाळाची अदलाबदली झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर बाळाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. प्रीती पवार नावाची महिला रविवारी (13 ऑक्टोबर) रात्री बाळंतपणाला रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी या महिलेनं मुलाला जन्म दिला असं सांगण्यात आलं. मुलगा जन्माला आला हे ऐकताच पवार कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. तसंच रुग्णालयाच्या रजिस्टरमध्येही मुलाच्या जन्माची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (15 ऑक्टोबर) रात्री या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांच्या हाती मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळं संबंधित महिला आणि कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी मुलगी घेण्यास नकार दिला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

रुग्णालयात बाळाची अदलाबदल (Source - ETV Bharat Reporter)

याआधी देखील रुग्णालय वादात : नाशिक शासकीय रुग्णालयात अशा अनेक घटना घडल्या आहेत. याआधी या रुग्णालयात एका जिवंत बाळाला मृत घोषित करण्यात आल्याचीही घटना घडली होती. तसंच मृत व्यक्तीचं सोनं चोरी झाल्याचीही घटना रुग्णालयात घडली होती. त्यामुळं अशा अनेक कारणांवरुन हे रुग्णालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलं आहे.

कमिटी करणारा चौकशी : या संदर्भात प्रहार संघटनेनं पुढाकार घेत नातेवाईकांना पाठबळ देत थेट सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांना घेरावा घालत विचारपूस केली असता, याप्रकरणी एक कमिटी गठीत केली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी नातेवाईकांना दिलं. यासोबतच कागदपत्र व सीसीटीव्हीच्या आधारे चौकशी देखील सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. लाडकी बहीण अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत?; 'या' स्टेप करा फॉलो, खात्यात येतील पटकन पैसेट
  2. लोखंडवाला परिसरात इमारतीला भीषण आग, आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू
  3. खासदार अनिल देसाईंना मोठा दिलासा; खासदार म्हणून निवडीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

Last Updated : Oct 16, 2024, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.