ETV Bharat / state

साताऱ्यात विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

विवाहितेनं दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Woman Commits Suicide
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 7:05 AM IST

सातारा : माण तालुक्यात विवाहित महिलेनं आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवलं आहे. ही घटना समजल्यानंतर पतीनंही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या विवाहित महिलेनं आत्महत्या का केली, याचं कारण अद्यापही कळू शकलं नाही. या तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महिलेची दोन चिमुकल्या मुलींसह आत्महत्या : सातारा जिल्ह्यातील धामणी गावातील ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण (वय 25) हिनं सोमवारी मध्यरात्री शिवानी (वय 3 महिने) आणि स्वरांजली (वय 6 वर्षे) या मुलींसह गावलगतच्या तलावात उडी मारून जीवन संपवलं. या घटनेची माहिती कळताच पती स्वप्नील बापू चव्हाण (वय 28) यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला म्हसवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं तो बचावला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांना माहिती कळताच तलावाच्या काठावर मोठी गर्दी उसळली.

तलावातून तिघांचे मृतदेह काढले बाहेर : या खळबळजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत महिलेच्या दीरानं पोलिसांना या याबाबत माहिती दिली. त्यानंतर म्हसवड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तिन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढले. दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेचं गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार हे सखोल तपास करत आहेत. मात्र विवाहित महिलेनं आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह आत्महत्या केल्यानं परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. डोळ्यादेखत भावंड नदीपात्रात बुडताना माऊलीनं दाखविलं प्रसंगावधान, नेसलेली साडी सोडून दोघांना वाचविलं! - Ahmednagar Floods News
  2. Satara Suicide News : साताऱ्यात नवविवाहित तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून आत्महत्या
  3. एकाच दिवशी दोन धक्कादायक घटना; डॉक्टरची दवाखान्यात आत्महत्या तर.. तरूणीचा पाय घसरून मृत्यू - Satara Suicide News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.