पुणे Woman Beaten Pune : पुणे शहराला सांस्कृतिक राजधानी तसंच सुरक्षित व सुसंस्कृत शहर म्हटलं जातं. पण, मागील काही दिवसात पुणे शहरात घडत असलेल्या घटना पाहता हे शहर खरंच सुरक्षित आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी पुणे शहरात भरदुपारी बाणेर परिसरात दुचाकीवर चिखल उडाला म्हणून जोरदार वाद झाला. या वादावादीतून एका ज्येष्ठ नागरिकानं एका दुचाकीस्वार महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : पुण्यातील बाणेर पाषाण रोडवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी स्वप्नील केकरे (वय 57) यांच्याविरुद्ध पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत संबंधित महिलेनं तक्रार दिली होती.
दोघांमध्ये झाला वाद : याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी सांगितलं की, "शनिवारी दुपारी बाणेर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तक्रारदार दुचाकीवर असताना आरोपीची कार पुढं जात होती. त्याचवेळी चारचाकी वाहनामुळं दुचाकीवर चिखल उडाला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावरून आरोपीनं तक्रारदाराला थांबवून शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपीची ओळख पटली असून या ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली."
शिवीगाळ करत मारहाण : या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला हडपसर येथून जेवणासाठी बाणेर येथे चालली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाणेर येथील महाबळेश्वर हॉटेल चौकात जात असताना पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कारनं तक्रारदाराच्या दुचाकीवर चिखल उडवला. यातून दोघात बाचाबाची झाली. तक्रारदार पुढं गेल्यावर या चारचाकी वाहनातील ज्येष्ठ नागरिकानं महिलेचा सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करत महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळं महिलेच्या तोंडातून रक्त वाहत होतं.
हेही वाचा -
Woman Beaten : धक्कादायक! बेदम मारहाण करत महिलेचे फाडले कपडे अन् केले 'हे' लाजिरवाणे कृत्य
Video महिलेला आधी झाडाला बांधले, नंतर जोरजोराने मारले.. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल