बीड MBBS From Abroad : देशातील कोणत्याही खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. NEET परीक्षा यूजी आणि पीजी अशा दोन्ही स्तरांवर घेतली जाते. सध्या नीट यूजी (NEET UG) परीक्षा चर्चेत आहे. NEET UG पेपर लीक घोटाळ्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. दरवर्षी 20 लाखांहून अधिक विद्यार्थी NEET UG परीक्षेला बसतात. मात्र, लाखो विद्यार्थी विदेशी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करतात.
विदेशात जाण्याची काय आहेत कारणं : एका अहवालानुसार, सध्या सुमारे 7 लाख 50 हजार विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमधून एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. विदेशातून एमबीबीएस करण्यासाठी भारतीय विद्यार्थी रशिया, चीन, कझाकस्तान इत्यादी देशांमध्ये जातात. पण, दरवर्षी लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जातात. त्यापैकी अनेक विद्यार्थी NEET परीक्षा उत्तीर्ण आहेत. तर, काहींनी NEET परीक्षेत चांगले गुणही मिळविले आहेत.
- MBBS भारतात की परदेशात?: इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, मेडिकल या तीन अभ्यासक्रमांबद्दल बोलायचं झाल्यास बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जातात. परदेशातून एमबीबीएस करणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी लक्षणीय वाढ होत आहे. यासाठी अनेक कारणे दिली जातात.
- विदेशात एमबीबीएसचा अभ्यास करणं स्वस्त : भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत विदेशातून एमबीबीएसचं शिक्षण घेणं स्वस्त आहे. काही भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, एमबीबीएसची फी कोट्यावधीपर्यंत आहे. तर काही विदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पूर्ण अभ्यासाची फी 10 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असते.
- प्रवेश मिळणं सोपं : भारतातील खासगी, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये NEET उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रवेश मिळतो. चांगल्या गुणांनी NEET उत्तीर्ण होऊनही अनेक विद्यार्थ्यांना उच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येत नाही. त्याचबरोबर विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणं सोपं आहे.
- टॉप स्कोअररची गरज नाही : काही विदेशी वैद्यकीय महाविद्यालये NEET उत्तीर्ण झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. खूप चांगले गुणे असण्याची अट लागू करत नाहीत.
- भारतात मेडिकलच्या जागा कमी : NEET उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक 11 विद्यार्थ्यांपैकी फक्त एकाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. अशा परिस्थितीत इतर विद्यार्थ्यांकडं फक्त 2-3 पर्याय उरतात. एकतर विदेशात जाऊन शिक्षण घ्या. अन्यथा एक वर्ष एमबीबीएसच्या प्रवेशासाठी वाट पाहा. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्याचा पर्याय निवडावा लागतो.
हे वाचलंत का :