ETV Bharat / state

अमोल कीर्तिकरांची सात तास ईडी चौकशी; ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी - Kirtikar Supporters Slogans - KIRTIKAR SUPPORTERS SLOGANS

Amol Kirtikar ED Investigation : खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची ईडी कडून सात तास चौकशी करण्यात आली. यावेळी मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर जमलेल्या कीर्तिकरांच्या कार्यकर्त्यांनी कीर्तिकरांना भावी खासदार संबोधत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Amol Kirtikar ED Investigation
अमोल कीर्तिकर समर्थक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 6:38 PM IST

Updated : Apr 8, 2024, 8:43 PM IST

ईडी कार्यालयाबाहेर जमलेली अमोल कीर्तिकरांच्या समर्थकांची गर्दी

मुंबई Amol Kirtikar ED Investigation : मुंबई वायव्यचे ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अमोल कीर्तिकर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आज (8 एप्रिल) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अमोल कीर्तिकर फोर्ट परिसरात असलेल्या ईडी कार्यालयात दाखल झाले होते. खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकर यांची चौकशी ईडी कडून सात तास चौकशी पार पडली. दरम्यान अमोल कीर्तिकरांच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.

अमोल कीर्तिकरच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांची 27 मार्चला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषणा करण्यात आली आणि 28 मार्चला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, अमोल कीर्तिकर यांचे वकील ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते आणि त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वाढीव वेळ मागितला होता. त्यानुसार ईडीने आज पुन्हा अमोल कीर्तिकर यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आणि 8 एप्रिल रोजी ईडीच्या चौकशीला बोलावले. त्याप्रमाणे अमोल कीर्तिकर ईडीच्या चौकशीसाठी आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात बाहेर हजर झाले असता अमोल कीर्तिकर यांच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी "अमोल भैया आगे बढो, हम तुम्हारे साथ है" आणि "अबकी बार, अमोल भैया खासदार", "मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है", अशा घोषणा दिल्या.

ईडीच्या टायमिंगवर पुन्हा चर्चा सुरू: लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी 27 मार्चला जाहीर झाली. यात मुंबई वायव्य मतदारसंघातून अमोल गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली गेली. त्यानंतर काही वेळातच ईडीने पाठवलेल्या समन्सची चर्चा रंगली होती. त्यामुळं पुन्हा एकदा ईडीच्या टायमिंगवर चर्चा सुरू झाली. यापूर्वीही ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांची देखील खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. सध्या सुरज चव्हाण हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चव्हाण यांची जवळपास 60 ते 70 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीमुळं त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जातं. तसेच अमोल कीर्तिकर यांच्या डोक्यावर ईडीच्या अटकेची टांगती तलवार असल्याची देखील चर्चा आहे.

हेही वाचा :

  1. वाघांच्या भूमीत पंतप्रधान मोदींचा आवाज, जाणून घ्या भाजपासाठी का महत्वाची आहे चंद्रपूर लोकसभा - Lok Sabha Election 2024
  2. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam
  3. खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक - Lok Sabha Elections

Last Updated : Apr 8, 2024, 8:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.