ETV Bharat / state

पुरोगामी महाराष्ट्रात कधी वाढणार महिलांचं नेतृत्व ? 288 आमदारांच्या सभागृहात फक्त 24 'लाडक्या बहिणी'

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जाते, मात्र तरीही 288 आमदारांच्या सभागृहात केवळ 24 लाडक्या बहिणी आमदार आहेत. अद्यापही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभली नाही.

Maharashtra Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात महिला नेतृत्वाला संधी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 288 आमदारांच्या सभागृहात फक्त 24 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. 1972 मध्ये राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 26 महिला आमदार निवडून गेल्या. विशेष म्हणजे 53 महिला उमेदवार त्यावेळी रिंगणात होत्या. त्यापैकी 26 जणींचा विजय झाला. 2019 च्या निवडणुकीत 239 महिला उमेदवार रिंगणात होत्या, त्यापैकी केवळ 24 जणींना विजयाचा गुलाल उडवण्याची संधी मिळाली.

विधानसभेत 1990 ला केवळ 6 महिला आमदार : विधानसभेत सर्वात कमी महिला आमदार 1990 मध्ये निवडून आल्या. यावेळी 148 जणींनी निवडणूक लढवली, त्यापैकी अवघ्या 6 महिलांना त्यावेळी विजय मिळाला. 1962 मध्ये राज्याच्या पहिल्या निवडणुकीत 36 महिला रिंगणात होत्या, त्यापैकी 13 जणी विजयी झाल्या. त्यावेळी विधानसभेत 263 सदस्य निवडून दिले जात असत. 1967 मध्ये 19 महिलांनी निवडणूक लढवली. त्यापैकी 9 जणींना आमदार म्हणून विधिमंडळात प्रवेश करण्याची संधी मिळाली.

आणीबाणीनंतर पडला नाही फरक : आणीबाणीनंतर 1978 मध्ये राज्यभरातून 51 महिलांनी निवडणूक लढवली. त्यापैकी 8 महिला विजयी झाल्या. 1980 च्या निवडणुकीत 47 महिला उमेदवार रिंगणात होत्या, त्यापैकी 19 महिलांना विजय मिळाला. 1985 मध्ये राज्यभरात 47 महिला उमेदवार निवडणुकीला उभ्या होत्या, त्यापैकी 16 महिलांना आमदार होण्याची संधी मिळाली. 1995 मध्ये 247 महिला उमेदवार रिंगणात होत्या, त्यापैकी केवळ 11 जणींना विजय मिळवता आला. 1999 मध्ये महिला उमेदवारांचं प्रमाण कमी होऊन 86 जणींनी निवडणूक लढवली, त्यापैकी 12 जणींनी विधिमंडळात प्रवेश केला. 2004 मध्ये 157 जणींनी निवडणूक लढवली, त्यापैकी 12 जणी आमदार म्हणून निवडून गेल्या. 2009 च्या निवडणुकीत 211 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 11 जणींना विजय मिळवता आला. 2014 मध्ये सर्वाधिक म्हणजे 277 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 20 महिलांना आमदारकीचा टिळा लावता आला. राज्यात आजपर्यंत ज्या महिला आमदार म्हणून विजयी झाल्या, त्यापैकी अनेकजणी राजकीय घराण्याशी संबंधित होत्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विधिमंडळात पोचलेल्या महिला आमदारांची संख्या अत्यल्प अशीच आहे.

या महिला आमदारांनी संसदेत केली एन्ट्री : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महिला आमदारांपैकी प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं संसदेत त्यांचं पदार्पण झालं. 2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक 17 महिला भाजपा तर्फे उभ्या होत्या. त्यापैकी 12 विजयी झाल्या. काँग्रेसतर्फे 15 जणी उभ्या होत्या, त्यापैकी 5 विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 9 जणी उभ्या होत्या, त्यापैकी 3 जणी विजयी झाल्या. शिवसेनेतर्फे 8 जणींनी निवडणूक लढवली आणि त्यापैकी 2 जणी विजयी झाल्या. मनसेतर्फे 5 महिला रिंगणात होत्या, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. तर तब्बल 100 महिला अपक्ष म्हणून उभ्या होत्या, त्यापैकी 2 जणींना विजय मिळवता आला.

किती लाडक्या बहिणी आहेत मतदार : 2019 मध्ये राज्यात 4 कोटी 28 लाख 46 हजार 822 महिला मतदार होत्या. त्यापैकी 2 कोटी 53 लाख 90 हजार 647 महिलांनी मतदान केलं. यावेळच्या निवडणुकीसाठी राज्यात महिला मतदारांची संख्या 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 आहे. एकीकडं महाराष्ट्राचा उल्लेख पुरोगामी राज्य म्हणून केला जात असताना राज्यात अद्याप एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही, ही बाब दुर्लक्षली जावू शकत नाही.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रातील राजकारणात महिलांना दुय्यम स्थान; 'महिलाराज' फक्त नावालाच, जाणून घ्या आकडेवारी
  2. भाजपाच्या पहिल्याच यादीत अशोक चव्हाणांच्या मुलीसह 13 महिलांना संधी; कुणाला मिळाली उमेदवारी?
  3. अरविंद केजरीवाल यांची 'आतिशी' खेळी : शिला दीक्षितांनंतर दिल्लीत पुन्हा 'महिलाराज', देशात आत्तापर्यंत 16 महिला मुख्यमंत्री - Delhi CM Announcement

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.