ETV Bharat / state

मणिपूर हिंसाचारावरुन मोदी सरकारला इशारा?, मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या अर्थ काय? - Mohan Bhagwat On Manipur violence - MOHAN BHAGWAT ON MANIPUR VIOLENCE

Mohan Bhagwat On Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. याबाबत त्यांनी सरकारला मणिपूरमध्ये लक्ष देण्याची सूचना केली. ते सोमवारी (10 जून) नागपुरात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग कार्यक्रमात बोलत होते.

Sarsanghchalak Mohan Bhagwat, Modi
सरसंघचालक मोहन भागवत, नरेंद्र मोदी फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 5:51 PM IST

Updated : Jun 11, 2024, 6:20 PM IST

मुंबई Mohan Bhagwat On Manipur Violence : देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन झालं. मागील 10 वर्षात भाजपा सरकारनं अनेक कामं केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव त्यांनी पोहचलं. आर्थिक वाढ, देशाची प्रतिष्ठा, कला, विज्ञान, संस्कृतीत आपण पुढे जातोय. परंतु गेल्या वर्षापासून मणिपूर धुमसतंय. वर्षभरापासून मणिपूर शांततेच्या प्रतिक्षेत आहे. पण, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित केली जात नाही, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केली. नागपुरात सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग कार्यक्रमाचा समारोप झाला, यावेळी सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते.

सरसंघचालकांचा गर्भित इशारा? : मोदी सरकारची मणिपूरवरुन मोठी नाच्चकी झालीय. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात असताना पंतप्रधान, गृहमंत्री तिकडे फिरकले नाहीत. त्यावेळी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांना धारवेर धरलं होतं. त्यामुळं मोदी सरकार मणिपूरचा प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरलं. मणिपूर शांत करण्यास सरकारनं प्राथमिकता द्याला हवी होती, असा अप्रत्यक्ष गर्भित इशारा मोहन भागवत यांनी मोदी सरकारला दिला आहे. मणिपूरच्या हिंसाचाराबद्दल मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मोदी सरकार मणिपूरचा हिंसाचार हाताळण्यास अपयश का ठरलं?, मोहन भागवत यांच्या वक्तव्याची दखल घेऊन मोदी सरकार मणिपूरचा प्रश्न तात्काळ मार्गाी लावेल का?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत.

मणिपूरचा प्रश्न मार्गी लागू शकतो : मणिपूर मुद्द्यावरुन मोहन भागवतांनी मोदी सरकारचे कान टोचलेय. त्यामुळं आगामी काळात मणिपूरचा मुद्दा केंद्र सरकार गांभीर्यानं घेऊन शांतता प्रस्थापित करणार का?, याबाबत राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. मोदी सरकार तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलं आहे. आता मणिपूरच्या मुद्द्यावरून संघानं हस्तक्षेप केला आहे. त्यामुळं याचे परिणाम आगामी काळात नक्कीच दिसून येतील. मणिपूरचा प्रश्न सरकार प्राधान्यानं सोडवू शकतं, असं राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी म्हटलं आहे.

संघ, राजकारणात लक्ष घालेल? : आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऍक्टिव्ह झाला असून भाजपाच्या राजकारणामध्ये लक्ष घालेल, असं वाटतंय. मागं झालेल्या चुका आता पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल. त्यामुळं आगामी काळात नक्कीच काही चांगले निर्णय दिसून येतील. मुख्य म्हणजे पुढील वर्षी म्हणजे 2025 साली संघाला 100 वर्ष पूर्ण होताहेत. संघाता शताब्दी साजरी करण्यात येणार आहे. संघाला शंभरी होत असताना अनेक चांगले निर्णय होऊ शकतात, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारच्या निर्णयावर लक्ष : तसंच मणिपूर हा एकमेव विषय नाही, किंवा हा फक्त मणिपूर पुरता मर्यादित प्रश्न नाही. तिबेट, चीन या सीमा भागालगतचे अनेक प्रश्न आहेत. तिथं वंशिक वाद आहे. याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतला जातो. त्यामुळं आता लगेच मोदी सरकार यावर निर्णय घेईल किंवा नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. मात्र, यावर प्राधान्यानं मोदी सरकार तोडगा काढू शकतं. पण इथं बसून बोलणं किंवा लिहिणं सोपें आहे. प्रत्यक्ष तिकडं जाऊन कुणी पाहणी केली आहे का? विरोधक तरी तिकडं गेलेत का? असा प्रश्न उदय तानपाठक यांनी उपस्थित केलाय. परंतु ज्याअर्थी आता संघानं यावर भाष्य केलंय त्याअर्थी हे सरकार प्राधान्यानं मणिपूरमध्ये लक्ष घालेल, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी म्हटलं आहे.

'हे' वाचलंत का :

  1. भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत विनोद तावडे, संकेत की चकवा? - BJP National President
  2. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार? नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी - Maharashtra Cabinet Expansion
  3. लोकसभा निवडणुकीत हरलेल्यांना वाटतंय ते जिंकले, तर जिंकलेल्यांना वाटतंय ते हरले...वाचा असं का.. - Lok Sabha Election Result

Last Updated : Jun 11, 2024, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.