ETV Bharat / state

सोने चांदीचे भाव घसरले; पुण्यात बजेटनंतर सोन्या-चांदीचा काय आहे दर; पहा किंमती - Pune Gold Rate - PUNE GOLD RATE

Pune Gold Rate : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) केला. अर्थसंकल्पानंतर सोने-चांदी स्वस्त (Gold And Silver Rate) झाल्याचं दिसून येत आहे.

Pune Gold Rate
सोने-चांदी (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 7:59 PM IST

पुणे Pune Gold Rate : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात विविध क्षेत्रासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने-चांदीवरील (Gold And Silver Rate) आयात कर 6.5 टक्क्यावरून 6 टक्के केल्यानं सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत 3 हजार तर चांदीच्या किंमतीत 5 हजारने घसरण झाली आहे.

प्रतिक्रिया देताना व्यावसायिक फत्तेचंद रांका (ETV BHARAT Reporter)

ग्राहकांना फायदा : याबाबत सराफ व्यावसायिक फत्तेचंद रांका म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कस्टम ड्युटी ही कमी केली आहे. जी कस्टम ड्युटी 15 टक्के होती ती 6 टक्के झाली आहे. 9 टक्क्यांनी कस्टम ड्युटी ही कमी केली आहे. यामुळं सोने आणि चांदीच्या किंमतीत खूप फरक पडला आहे. सोन्यात 3 हजार तर चांदीमध्ये 5 हजार रुपये कमी झाले आहेत. आज सोने-चांदीबाबत जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो खूपच चांगला आहे. याचा ग्राहकांना फायदा होणार आहे.

पुढील काळात सोन्याचे भाव वाढणार : ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. कारण सोन्याचं उत्पादन हे भारतात होत नाही, तर परदेशात होत असतं. विविध देश हे सोन्याची साठवणूक करत आहेत. तर दुसरीकडं युद्धाचं वातावरण आहे. तसंच जागतिक परिस्थिती पाहता पुढील काळात सोन्याचे भाव वाढू शकतात. यामुळं आज जी सुवर्णसंधी आली आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन, रांका यांनी केलय. तसंच आजच्या या निर्णयानं ग्राहकांची संख्या देखील वाढणार आहे.

काय आहे भाव : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर 24 कॅरेट सोन्याचे भाव हे तोळ्याला 72 हजार 450 रू होते. तसंच चांदीचा भाव 90 हजार होते. जसा अर्थसंकल्प सादर झाला, तसा २४ कॅरेट सोन्याचा भाव हा तोळ्याला 69 हजार 450 तर एक किलो चांदीचा भाव 86 हजार झाला आहे.

सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी : सोने-चांदीचे भाव कमी झाल्यानंतर दुकानात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. यावेळी एका ग्राहकाने सांगितलं की, आज आम्ही खूप खुश आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोने खरेदी करण्याचा विचार करत होतो, पण खरेदी करता येत नव्हतं, पण आज भाव कमी झाल्याने सोनं खरेदी करता आलं.

हेही वाचा -

  1. "अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस, मात्र...."; अर्थसंकल्पावर काय म्हणाले प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट बकुल मोदी? - Union Budget 2024
  2. अर्थसंकल्प सादर होताच शेयर बाजार ढासळला; काय आहेत नेमकी कारणं? - Budget Impact on Share Market
  3. कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केली थेट लाभ हस्तांतरण योजना, EPFO साठी 3000 कोटींची घोषणा - Union Budget 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.