पुणे Lok Sabha Election 2024 : महायुतीचं जागावाटप 28 तारखेला होणार आहे. परंतु, माढामध्ये धैर्यशील मोहिते भाजपामध्ये नाराज आहेत. तर, राष्ट्रवादीत रामराजे निंबाळकर नाराज आहेत. ही अंतर्गत नाराजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची याबद्दल चर्चा सुरू आहे. सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळे एकत्र बसून करत आहोत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज महायुतीच्या उमेदवारासाठी पैलवानांचा आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांचा मेळावा भरवण्यात आला होता. त्याला अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरिल गोष्टी सांगितल्या.
वंचितमुळे अनेक नेते पराभूत झाले : अजित पवार म्हणाले, 28 तारखेला महाराष्ट्रातील महायुतीच्या 48 जागांचं चित्र स्पष्ट होईल. मग त्यात सातारा असेल, नाशिक असेल, माढा हे सगळी मतदारसंघ असतील. असंही अजित पवार म्हणाले. तसंच, प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे यावर बोलताना, ते वंचित आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांची निश्चितपणे आज महाराष्ट्रामध्ये ताकद आहे. (Lok Sabha Election 2024) आपण मागच्या वेळी पाहिलं त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार पराभूत झाले. सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, राजेश विटेकर अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील असंही अजित पवार म्हणाले आहेत.
मत विभागणी होणार : वंचितला लाखांच्या पुढे मतदान झालं आणि त्यातून आघाडीच्या उमेदवाराला पराभवाचा फटका बसला. प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडी सोबत बोलणी सुरू होती. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सही आम्ही बघत होतो. परंतु, शेवटी ज्याने त्याने काय निर्णय घ्यायचा हा संविधानाने दिलेला त्यांचा अधिकार आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत. वंचित आणि मनोज जरांगे हे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मत विभागणी होईल का? यावर अजित पवार म्हणाले जास्त उमेदवार उभे केल्यानंतर मत विभागणी होते. त्याचा फटका कुणालातरी बसतोच असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :