ETV Bharat / state

धरणातील पाणीसाठा खालावला, 3000 पेक्षा अधिक वाडी वस्त्यांवर टॅंकरनं पाणीपुरवठा - Water Scarcity In Maharashtra

Water Scarcity In Maharashtra : राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती आता अधिक भीषण होऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस धरणांमधील पाणीसाठा 39 टक्क्यांवर आला आहे. तर राज्यातील तीन हजारपेक्षा अधिक वाडी वस्त्यांवर टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा ही परिस्थिती अधिक भीषण असली तरी राज्य सरकारच्यावतीनं टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचं पाणीपुरवठा विभागाच्या अवर सचिव सुगंधा पवार यांनी सांगितलं.

Water Storage in Maharashtra Dams is depleting water supply by tanker in more than 3000 settlements
धरणातील पाणीसाठा खालावला, 3000 पेक्षा अधिक वाडीवस्त्यावर फिरताहेत टँकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 4:57 PM IST

मुंबई Water Scarcity In Maharashtra : दरवर्षी राज्यात होळी पेटल्यानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यंदाही मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यातच गतवर्षी पावसानं मारलेली दडी लक्षात घेता यंदा धरणांमधील पाणीसाठा लक्षणीयरित्या कमी झाला आहे. गतवर्षी 55 टक्क्यांच्या आसपास असलेल्या धरणांमधील साठा यंदा 39 टक्क्यांवर आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मराठवाड्यातील धरणं आटली : राज्यातील मोठ्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा गतवर्षी याच काळात 55% इतका होता. मात्र, यंदा तो 39 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. यामध्ये नागपूर विभागातील धरणांमध्ये तुलनेनं पाणीसाठा बरा असला तरी अमरावती विभागात मात्र गतवर्षी 56% असलेल्या पाणीसाठा यंदा 45 टक्क्यांवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागाला यंदाही मोठ्या पाणीटंचाईला सामोरं जावं लागत असून या विभागात गतवर्षी असलेला 44% पाणीसाठा आता केवळ 23 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. नाशिक विभागातील मोठ्या धरणातील पाणीसाठा 59% होता, यंदा तो 40 टक्के वर आला आहे. पुणे विभागातील पाणीसाठा देखील 68% वरून 39 टक्क्यांवर आलाय. राज्यात असलेल्या एकूण 138 मोठ्या प्रकल्पात आता केवळ 39 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

काय आहे मध्यम धरणांची स्थिती : राज्यामध्ये असलेल्या 260 मध्यम धरणांमध्ये यंदा 44% इतका पाणीसाठा असून गतवर्षी तो 58% इतका पाणीसाठा होता. विदर्भातील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत जवळपास सारखाच असला तरी मराठवाड्यात मात्र अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी 56% असलेला पाणीसाठा आता केवळ 19% इतकाच उरला आहे. नाशिक आणि पुणे विभागातील मध्यम धरणांमध्ये देखील गतवर्षी 59 टक्क्यांच्या आसपास असलेला पाणीसाठा आता 43 टक्क्यांवर येऊन ठेपलाय.

राज्यातील सर्व धरणांची स्थिती काय : राज्यात एकूण 2994 मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांपैकी सर्वात भीषण परिस्थिती ही मराठवाड्यातील धरणांमध्ये दिसत आहे. मराठवाड्यात असलेल्या 920 धरणात गतवर्षी 47% पाणीसाठा होता, तो यंदा केवळ 20% इतकाच उरलाय. राज्यात असलेल्या सर्व धरणांमध्ये गतवर्षी या काळात 54% इतका पाणीसाठा होता, तो यंदा 39 टक्के इतका झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

3000 पेक्षा अधिक वाडी वस्त्यांवर टॅंकरनं पाणीपुरवठा : राज्यातील वाडी वस्त्यांवर पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. राज्यातील सुमारे 875 गावे आणि 2100 वाड्यांवर 950 टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. गतवर्षी केवळ शंभर गावांमध्ये पाणीटंचाई होती, तेव्हा 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसली असून मराठवाड्यात आता 232 गावं आणि 73 वाड्यांवर सुमारे 385 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातही परिस्थिती गंभीर झाली असून 345 गावं आणि 1285 वाड्यांवर सुमारे 258 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक विभागातील परिस्थिती ही हळूहळू गंभीर होत असून आता 265 गावं आणि 680 वाड्यांवर सुमारे 275 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. विदर्भात मात्र परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. अमरावती विभागात 17 गावांना 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. तर शासकीय आणि खासगी टँकरद्वारे राज्य सरकार पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत असून जनतेला पाणीटंचाईची झळ कमीत कमी बसावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आल्याची माहिती सुगंधा पवार यांनी दिली.

हेही वाचा -

  1. मराठवाड्यातील जलसाठ्यात 25 टक्केच पाणीसाठा, मार्च महिन्यातच पुन्हा भीषण दुष्काळाची चाहूल - World Water Day 2024
  2. निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पाणीबाणी, काय आहे परिस्थिती? - Water shortage in Mumbai
  3. Mumbai Water Supply Reduction: जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामामुळे 24 एप्रिल पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5 टक्के कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.