मुंबई- चित्रपट अभिनेते सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला धार्मिक कट्टरतावाद्यांकडून झाला आहे का, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलीय.
आव्हाडांची काय आहे पोस्ट? : सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खानला त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेनंही तपास होणे आवश्यक आहे. कारण सैफ अली खान याच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येतंय. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याच्या मणक्यावर गंभीर दुखापत झालीय. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खानला भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर केलीय.
सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत काय? : सैफ अली खान हल्ला प्रकरणाने मुंबईतील आणि गेल्या काही कालावधीत घडत असलेल्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आली असल्याची टीका आव्हाड यांनी केलीय. समाजातील हाय प्रोफाईल व्यक्ती, संरक्षण असलेल्या व्यक्ती जर सुरक्षित नसतील, मुंबईत त्यांच्या घरी जाऊन हल्ला होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत काय म्हणावे, असे आव्हाड म्हणालेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याची मागणी आव्हाडांनी केलीय.
सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे… pic.twitter.com/9atYhziAtl
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 16, 2025
कायदा आणि सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे- पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिलीय. त्या परिसरात यापूर्वी एकाची हत्या केली गेली तर आता हा हल्ला करण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती किती खराब झाली आहे, याचे हे उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.
हेही वाचा-