ETV Bharat / state

लंडन येथून आणली जाणारी 'ती' वाघनखं शिवरायांची नाहीत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा काय? - indrajit sawant claim

Shivaji Maharaj Waghnakha : लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम येथून आणली जाणारी 'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय.

Shivaji Maharaj Waghnakha
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 10:32 PM IST

कोल्हापूर Shivaji Maharaj Waghnakha : लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम येथून आणली जाणारी 'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. संबंधित म्युझीअमकडून तशी स्पष्टपणे कबुलीच पत्राद्वारे दिल्याची कागदपत्रं दाखवून, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आज कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत राज्य शासनाच्या खोटेपणाचा भांडाफोड केला. तसंच यासाठी सुरक्षेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असून, त्याचं टेंडरही राज्याबाहेरील कंपनीला दिल्याकडं लक्ष वेधत, महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्याही सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कधीही अशाप्रकारे खोटं बोलुन अवमान केला नाही. त्यामुळं शासन पुरस्कृतच खोटा इतिहास मांडला जात असल्याची खंतही इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (ETV Bharat Reporter)

विश्वासार्हतेला तडा पोहोचवण्याचा प्रयत्न : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा खात्मा करताना वापरलेली ती वाघनखं मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहेत. अनेक ठोस पुराव्यानुसार ती सातारच्या छत्रपतींच्याकडे कायम राहिली आहेत. महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडली गेली आहे. म्हणूनच लंडन मधील असणाऱ्या वाघनखांच्या प्रतिकृतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं असल्याचं सांगून, छत्रपतींच्या आणि विशेषतः पेशव्यांच्या कैदेतून सुटून सातारा राज्याची पुर्नस्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासार्हतेला तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंकाही यानिमित्तानं निर्माण झाल्याचं इंद्रजित सावंत म्हणाले.

गंभीर विषयाबाबत सरकरची उदासीनता : विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन इथं असणाऱ्या विविध वाघ नखांपैकी एक वाघनख तीन वर्षांकरीता भाडेतत्वावर आणण्याचा सामंजस्य करार 3 ऑक्टोबर 2023 रोजी, महाराष्ट्र शासन आणि या म्युझियममध्ये करण्यात आला. यावेळी व यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर, वरिष्ठ अधिकारी तसंच राज्य शासनाकडूनही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा वृत्तपत्र आणि विविध माध्यमांतून कारण्यात आला. त्या संदर्भातील शासन निर्णय देखील सार्वजनिक कारण्यात आले आहेत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचे ठोस पुरावे सांस्कृतिक कार्य मंत्री, सचिव आणि राज्य पुरातत्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांना आपण वारंवार पत्रव्यवहारातून निदर्शनास आणून दिले. यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांनाही पाठवले आहे. पण या गंभीर विषयाबाबत सरकरची उदासीनता दिसून येत असुन, उलट अजूनही खोटी माहिती विविध माध्यमांतून प्रसारित केली जात असल्याचं इंद्रजित सावंत यांनी सांगितलं.

लाखो-करोडो शिवप्रेमींची दिशाभूल : म्युझीअमकडे ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा नसल्याची लेखी माहिती विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअमकडून देण्यात आली आहे. शिवाय सामंजस्य करार करताना उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळाला ही माहिती स्पष्टपणे सांगण्यात आली होती. पण महाराष्ट्र शासन, मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून अशी महत्वाची माहिती जनतेपासून लपवून ठेवणं ही एक गंभीर बाब आहे. जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती महाराजांचीच आहे असं भासवून लाखो-करोडो शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचंही सावंत म्हणाले.

वाघनखं प्रदर्शनाचा घाट का व‌ कोणासाठी : ही वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी करोडो रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे. कोल्हापुरातही या प्रदर्शनासाठी सुमारे 7 कोटी रुपये खर्च होणार आहेत. याचं कामही महाराष्ट्राबाहेरीलच कंपनीला दिलं आहे. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पुरातत्व व संग्रहलये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या निरीक्षणाखाली सुरु होती. पण तेजस गर्गे हे लाच घेतल्यामुळं मे महिन्यापासून निलंबित आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरु असताना, अशाप्रकारे वाघनख्यांच्या प्रदर्शानाचा घाट का व‌ कोणासाठी घातला जात आहे असा सवाल इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला. तसंच या विषयाची गांभीर्यानं दखल आता महाराष्ट्राच्या जनतेला घ्यावी लागणार आहे. यासाठी संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी तमाम मावळ्यांनी करावी अशी आपण एक त्यातीलच शिवाजी महाराजांचा मावळा या नात्यानं करत असल्याचं सावंत यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.