ETV Bharat / state

अवैध दारुसाठी डाक कंटेनरचा वापर; पालघरमधून दमण बनावटीची दारू जप्त - Liquor Seized In Palghar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 6:59 PM IST

Liquor Seized In Palghar : पालघर जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूवर मोठी कारवाई करण्यात आली. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना, १४ लाख १७ हजार ८६० रुपयांची अवैध दारू वाडा पोलिसांनी (Wada Police) जप्त केलीय.

Foreign Liquor Seized
बनावट दारू जप्त (ETV BHARAT Reporter)

पालघर Liquor Seized In Palghar : लोकसभेची निवडणूक लागताच पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त करण्यात आली होती. आता कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक सुरू असताना, पुन्हा एकदा पालघर वाडा पोलिसांनी (Wada Police) १४ लाख १७ हजार ८६० रुपयांचा बनावट दारूचा साठा मुद्देमालासह जप्त केलाय.

दमण बनावटीचे मद्य पालघरमध्ये : पालघर पोलिसांना अवैध दारूची माहिती वेळोवेळी मिळत असताना, उत्पादन शुल्क विभाग मात्र काय करत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालघर जिल्हा हा गुजरात, दीव-दमण आणि दादरा नगर हवेलीला लागून आहे. दमणचे बनावट मद्य पालघरमध्ये सीमा तपासणी नाक्यावरून येत असते. सीमा तपासणी नाके तसंच उत्पादन शुल्क विभाग याकडं दुर्लक्ष करत आहे. मात्र, पोलीस मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत आहेत.

गस्तीत पकडला अवैध दारूचा ट्रक : वाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी गस्त घालत असताना, त्यांना गुजरातमधून येणाऱ्या अवैध दारूची माहिती मिळाली होती. ही दारू पालघर जिल्ह्यात विकली जाणार होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी जीजे ७ एक्स ३९८६ या कंटेनेरची तपासणी केली असता, त्यात अवैध दारू आढळली. १२ मार्चला पालघर पोलिसांनी एक कोटी सहा लाख ७२ हजारांचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला होता. तर आत्ता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना १४ लाख १७ हजार ८६० रुपयांची अवैध दारू पोलिसांनी जप्त केलीय.

पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न : कुरिअर आणि अन्य सामान पाठवण्यासाठी डाक कंटेनरचा वापर केला जातो. हे कंटेनर सील केलेले असते. त्यात अवैध दारू पाठवली, तर कुणालाही संशय येणार नाही, अशी चलाखी करण्यात आली. परंतु अशी चलाखी पोलिसांच्या खबऱ्यांमुळं उघडकीस आली. पोलिसांनी डाक कंटेनर ताब्यात घेऊन कारवाई केलीय.

यांनी केली कारवाई : पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, विजय डाखोरे, मयुरेश अंबाजी, गुरुनाथ गोतारणे, गजानन जाधव, चेतन सोनावणे, भूषण खिल्लारे, संतोष वाकचौरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बनावट दारूचा महापूर : तलासरी, डहाणू, हा भाग गुजरातच्या सीमेनजीक आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दीव-दमणची बनावट दारू विकली जात आहे. वास्तविक बियर शॉपमध्ये फक्त बियर विकायला परवानगी असताना, येथे अनेक प्रकारच्या देशी, विदेशी मद्याची विक्री केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही. सीमेपलीकडून चोरट्या मार्गाने दीव-दमणची बनावट दारू येत असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र डोळे झाकून बसला आहे.

उत्पादन शुल्कचे आर्थिक हितसंबंध : अनेक ठिकाणी बियर शॉप, बियर बार चालकाशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण संबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळं या रेस्टॉरंटमधून सर्रास बनावट दारूची विक्री होत असतानाही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट या बियर शॉप शेजारी चायनीजची मोठ्या प्रमाणात विक्री करून, येथे अवैधरित्या बियर पिण्यास मुभा दिली जात आहे. या सर्वांशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण संबंध असल्यानं, पालघर जिल्ह्यात सर्वत्र बनावट दारू, बियर तसंच परदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्री होत आहे.

उत्पादनशुल्क विभाग थंड : स्थानिक पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत दारू विक्रीची माहिती मिळते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला ती माहिती का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यात पालघर जिल्हा पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवैध मद्य तसेच अन्य प्रकरणात जोमाने कारवाई केली आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणतीही कारवाई का केली नाही, असा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘उत्पादन’ शुल्क विभागाबाबत संताप : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यांच्यामुळं तरुणांना दीव-दमणची बनावट दारू कमी पैशात उपलब्ध होत आहे. त्यामुळं ते मद्याच्या आहारी जात आहे. याप्रकरणी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

हेही वाचा -

  1. मतदानाच्या तोंडावर पालघरमध्ये पाच लाखांची दमणची अवैध दारू जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई - DAMANS LIQUOR SEIZED IN PALGHAR
  2. Padmashri Rahibais Yalgar : अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पद्मश्री राहीबाईंचा यल्गार; महिलांनी एकत्रित केले तीव्र आंदोलन
  3. Illegal Alcohol Sale : अवैध दारू विक्रीवर गुन्हे शाखेची कारवाई; बेकायदेशीर दारू विकणाऱ्यावर पोलिसांची कडक कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.