ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक 2024 : अकोल्यात मतदानाला शांततेत सुरुवात; सकाळच्या सत्रात 7 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजतापासून शांततेत मतदान सुरू आहे. अकोल्यात ढगाळ वातावरण असल्यानं धीम्या गतीनं मतदान प्रक्रिया सुरू आहे. अकोला मतदार संघात महायुतीकडून अनुप धोत्रे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

Lok Sabha Election 2024
मतदार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 11:54 AM IST

अकोला Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली. अकोला लोकसभा मतदार संघात सर्व 6 विधानसभा मतदार संघामधील 2056 मतदान पथकं कार्यरत आहेत. 11 हजार 544 कर्मचारी निवडणूक कार्यात गुंतली आहेत. 18 लाख 90 हजार 814 मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहे. सर्वच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सकाळपासून शांततेत सुरू झाली आहे. सकळी 7 ते 9 दरम्यान 7.17 टक्के मतदान झालं. मतदान प्रक्रिया धिम्या गतीनं सुरू असल्याचं दिसते. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे नागरिक वादळी पावसाच्या भीतीनं घराबाहेर पडत नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

Lok Sabha Election 2024
मतदार

मतदान प्रक्रिया शांततेत सुरू : जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजतापासून सुरू झाली. कुठंही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रशासन आणि पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिव्यांग आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या 21 ते 23 एप्रिल दरम्यान घरी जाऊन मतदान करून घेण्यात आलं आहे.

Lok Sabha Election 2024
प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर

या उमेदवारांमध्ये होणार आहे लढत : अकोला लोकसभा मतदार संघात भाजपाकडून अनुप धोत्रे, महाविकास आघाडीकडून डॉ अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासह 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. सर्वच उमेदवारांनी निवडून येण्यासाठी भरपूर प्रयत्न केले असले, तरी मतदार कोणाला कौल देतात हे 4 जूनला निकलांती समोर येईल.

Lok Sabha Election 2024
प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर

मतदान केंद्रावर होणार वेब कास्टिंग : निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. त्‍याअनुषंगानं 6 अकोला लोकसभा मतदार संघांतील एकूण 2056 मतदान केंद्रांपैकी एकूण 1038 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्‍याचं निश्चित करण्‍यात आलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही मतदार संघातील मतदान केंद्रावरील हालचालींवर मुख्यालयातून निरीक्षण ठेवता येणार आहे.

Lok Sabha Election 2024
मतदार

मतदान केंद्रांवरील सुविधा : प्रत्‍येक मतदान केंद्रांवर पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय करयात आली आहे. मतदारांना रांगांमध्‍ये उभे राहावं लागू नये, यासाठी कुपन पद्धत वापरण्‍यात येत आहे. 4-5 मतदारांनंतर रांगेतील इतर मतदारांना टोकन देऊन त्‍यांच्यासाठी सावलीची, बसण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर मेडीकल किट उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली असून संभाव्‍य त्रासाच्या अनुषंगाने जिल्हा शल्‍य चिकित्‍सक यांच्या सूचनेनुसार त्‍यामध्‍ये औषधी पुरवठा करण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024
मतदान यंत्रणा

हेही वाचा :

  1. बुलढाण्यात मतदानाला सुरुवात; अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभा निवडणूक 2024 मतदान ; विवाह होण्यापूर्वी अमरावतीत वरानं केलं मतदान - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.