ETV Bharat / state

मतदानाची लग्नपत्रिका; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महिलांचे प्रबोधन... - Voting Awareness Cards

Voting Awareness Cards : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झालीय. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नाशिकच्या 'श्री आदियोगी फाउंडेशन' (Shri Adiyogi Foundation) तर्फे जनजागृती केली जात आहे. यासाठी विशेष लग्नपत्रिका तयार करून त्याद्वारे मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 9:27 PM IST

Voting Awareness Cards
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती लग्नपत्रिका
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी तयार केली लग्नपत्रिका

नाशिक Voting Awareness Cards : जगातील सर्वात मोठी लोकशाही निवडणूक म्हणून भारताकडं बघितलं जातंय. आता काही दिवसांवर लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. तसेच आता काही सामाजिक संस्था देखील पुढाकार घेत आहेत नाशिकच्या इंदिरानगर भागातील 'श्री आदियोगी फाउंडेशन'तर्फे (Shri Adiyogi Foundation) मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रबोधन केलं जातय. यासाठी विशेष लग्नपत्रिका तयार करून त्याद्वारे जनजागृती केली जातेय.

लग्नपत्रिकेतून अनोखी मागणी : मतदान करून काय फायदा, कशाला रांगेत उभं राहायचं, मतदानानिमित्त सुट्टी आहे, कुठं तरी बाहेर फिरायला जाऊन आनंद घेऊ, आपण एकट्यानं मतदान केलं नाही तर काही फरक पडणार नाही. जो निवडून यायचा तो निवडून येईलच अशी काहीशी मानसिकता मतदारांची झालीय. याचा परिणाम घटणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर दिसून येतोय. त्यामुळं मतदानाचा टक्का वाढावा मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं शहरातील महिला संघटनांकडून आता नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. इंदिरानगर मधील 'श्री आदियोगी फाउंडेशन'तर्फे यासाठी विशेष लग्नपत्रिका तयार करून त्याद्वारे मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महिलांकडून प्रबोधन : नाशिक शहरातील इंदिरानगर, सातपूर, गंगापूर रोड, सिडको भागातही विविध महिला संघटनांकडून प्रबोधन करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याला हातभार म्हणून विविध संस्था संघटनांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी जाऊन मतदानासाठी जनजागृती करत आहेत. "भारतीय संविधानानं दिलेल्या मतदानाचा हक्क बजावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता जात, धर्म, समाज, भाषा, यांच्या प्रभाव पडून न देता मतदान करा", एक मतदानरुपी आशीर्वादानं लोकसभा निवडणुकीचा हा राष्ट्रीय उत्सव साजरा करा, अशा शब्दात महिलांकडून नागरिकांना प्रबोधन करण्यात येत आहे.

मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी असते. यादिवशी अनेक जण मतदान न करता फिरायला बाहेर जातात. आपण एकट्यानं मतदान केलं नाही तर काय फरक पडणार, अशी लोकांची मानसिकता असते. त्यामुळं मतदानाचा टक्का हा कमी होतो. त्यामुळं यंदा आम्ही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती सुरू केलीय. यासाठी आम्ही शहरात वेगवेगळ्या भागात ठीक ठिकाणी जाऊन प्रबोधन करत आहोत. यासाठी आम्ही खास लग्नपत्रिका तयार केली आहे. यातून नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून सांगत आहेत. - नितीन पाटील, श्री आदीयोगी फाउंडेशन

चि.मतदान व चि.सौ.कां लोकशाही यांच्या लग्नाला यायचं हं... : मतदानाची जनजागृती करण्यासाठी विशेष लग्नपत्रिका तयार करण्यात आलीय. यात चि.मतदान भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव, चि.सौ.कां लोकशाही भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या यांचा शुभविवाह वैशाख.शु. 12 सोमवार, दिनांक 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते 5 या शुभमुहूर्तावर आयोजित केला आहे. लोकसभा 2024 च्या निमित्तानं भारतीय संविधानानं दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी आहे. उज्वल भारतीयांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपलं एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठवण्यासाठी आपल्या एक मतदान रुपी आशीर्वादानं हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा यासाठीचं निमंत्रण आहे. आपलं विनंती, आम्ही भारताचे लोक, वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं... आमच्या शिवाय तर मज्जाच नाही कु निळीशाही, चि ईव्हीएम. स्थळ आपलं मतदान केंद्र. टीप "आपलं मतदान हाच आमचा आहेर आणि विकास भारत हेच तुमचं रिटर्न गिफ्ट". संकल्पना नितीन पाटील, सचिव 'श्री आदियोगी फाउंडेशन' नाशिक असा या पत्रिकेत उल्लेख आहे.

हेही वाचा -

  1. कमी कार्यकाळ बाकी असल्यानं अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय - Akola West Assembly By Election
  2. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज - Vikas Thackeray File Nomination
  3. "कोल्हापूर, साताऱ्याची जागा निसटली मग कसला 45 प्लस...", जयंत पाटलांनी उडवली भाजपाची खिल्ली - Jayant Patil On Mahayuti

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.