मुंबई Vistara Airlines : गुरुवारी दुपारच्या दरम्यान पॅरिसहून मुंबईत आलेल्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात फ्रेंच नागरिकानं धूम्रपान करुन सीटवरच शौच केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गौटर हेंरी ब्रॉक्स असं या पॅरिसहून आलेल्या फ्रेंच प्रवाशाचं नाव आहे. या प्रवाशाविरोधात सहार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 336 आणि विमान अधिनियम कलम 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धनंजय सोनवणे यांनी दिलीय. विस्तारा एअरलाइन्समध्ये सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या तजिंदर सिंग किरपाल सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सहार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विमानात सिगारेट ओढणे दंडात्मक असून विमान नियमांचं उल्लंघन केल्याप्रमाणे असते. त्यामुळं विमानतळ प्रशासन अशा व्यक्तीला अटकदेखील देखील करु शकते. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीला विमान प्रवासाला देखील काही काळासाठी मनाई केली जाते. असं असूनही काही प्रवासी आपल्या सोबत काडीपेटी, लाइटर आणि सिगारेट घेऊन विमान प्रवास करताना दिसून येतात.
प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होईल असं कृत्य : पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, 4 एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी सिक्युरिटी सुपरवायझर तजिंदर आले होते. विस्तारा एअरलाइन्सचं विमानं 3 एप्रिल रोजी पॅरिस होऊन तेथील स्थानिक वेळेनुसार रात्री 9:30 वाजता मुंबई करता रवाना झाले होते. या विमानाच्या आगमनाची वेळ 4 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांची होती. मात्र विमानाचं सकाळी नऊ वाजून 19 मिनिटांनी मुंबई विमानतळावर आगमन झालं. विमान मुंबई विमानतळावरील बेक क्रमांक व्ही 13 वर थांबलं होतं. विमानाचं मुंबई विमानतळ आगमन होण्यापूर्वी सिक्युरिटी सुपरवायझर यांना आलेल्या मेसेज नुसार मुंबई विमानतळावर पॅरिसहून आलेले विमान लँड होण्यापूर्वी सिक्युरिटी सुपरवायझर तजिंदर बेक क्रमांक v13 इथं थांबले होते. विमानातील सर्व प्रवासी उतरल्यानंतर विमानातील केबिन ग्रुप धरमजित सिंग यांनी विमानातील एका प्रवाशाला सिक्युरिटी सुपरवायझर यांच्याकडे सोपवलं. तसंच या प्रवाशानं युके 024 या विमानानं प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यानं चालू विमानामध्ये धूम्रपान केल्याचं सांगितलं. तसंच या प्रवाशानं टॉयलेटमध्ये न जाता सीटवरच शौच केल्याचंदेखील सांगितलं.
प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल : केबिन क्रू धरमजीत सिंग यांनी प्रवाशानं ओढलेल्या सिगारेटचा थोटका आणि त्याच्याकडे सापडलेला लाल रंगाचा लाईटर पुढील कारवाईसाठी सिक्युरिटी सुपरवायझर यांच्याकडे दिला. तसंच धरमजित सिंग यांनी या प्रवासाच्या गैरवर्तनाबाबत घटना अहवाल सिक्युरिटी सुपरवायझर यांच्याकडे दिला. या प्रवाशाची माहिती सीआयएसएफ कंट्रोल रुमला तसंच विस्तारा एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर फ्रेंच प्रवाशाला पुढील कारवाई करतात सहार पोलीस ठाण्यात घेऊन येण्यात आलंय. फ्रेंच नागरिक असलेला 36 वर्षीय गौटर हेनरी ब्रॉक्स यानं चालू विमानात धूम्रपान करुन विमानातील सर्व प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असं कृत्य केलं. तसंच एअरक्राफ्ट रुल 1937 चं उल्लंघन देखील केलंय. त्याचप्रमाणे सर्व प्रवाशांना त्रास होईल, असं कृत्य देखील केल्यानं त्याच्या विरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयात हजर केल्यानंतर फ्रेंच नागरिक गौटर याची 30 हजाराच्या जात मुचलक्यावर सुटका करण्यात आलीय, अशी माहिती सहार पोलीस ठाण्याचे अधिकारी सोनावणे यांनी दिली आहे.
हेही वाचा :