ETV Bharat / state

पावसाळ्यात घरांमध्ये शिरलेल्या डझनभर विषारी-बिनविषारी सापांना जीवनदान, पाहा व्हिडिओ - Snakes in Thane - SNAKES IN THANE

Thane News : ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसानं जोर धरल्यानं नदी, नाल्यालगत शेत, जंगलातील बिळात राहणाऱ्या विषारी-बिनविषारी सापांच्या बिळात पावसाचं पाणी शिरल्यानं पुन्हा एकदा या सापांनी मानवी वस्तीत शिरकाव केला. तीन दिवसात डझनभर विषारी-बिन विषारी सापांना मानवी वस्तीतून शिताफीनं पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून सर्पमित्रांनी जीवनदान दिलंय.

Venomous and non-venomous snakes that have entered human habitations have been given a lifeline by Sarpamitra
मानवी वस्तीत शिरलेल्या डझनभर विषारी-बिन विषारी सापांना सर्पमित्रामुळं जीवनदान (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 1:53 PM IST

Updated : Jun 25, 2024, 5:25 PM IST

ठाणे Thane News : पावसाळ्याच्या दिवसांत सापांच्या बिळात पाणी शिरल्यानं विषारी-बिन विषारी साप भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसात कल्याण पश्चिम भागातील विविध मानवी वस्त्यामध्ये विषारी आणि बिनविषारी साप शिरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये कल्याण पश्चिम उंबर्डे गावातील एका ग्रामस्थाच्या पाळीव बदकाच्या पिंजऱ्यात भलामोठा साप घुसून त्यानं बदकाची पिल्लं भक्ष्य केली होती. तर दोन हरणटोळ जातीचे (हिरवेगार) सापही याच गावातील मानवी वस्तीतून पकडण्यात आले आहेत.

विषारी-बिन विषारी सापांना सर्पमित्रामुळं जीवनदान (Source reporter)

वाडेघर गावातून डुरक्या घोणस जातीचा साप तर रोनक सिटी भागातून दिवड जातीचे 2 भलेमोठे साप सर्पमित्र दत्ता यांनी पकडली. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. तसंच एका घराच्या पडवीत कोब्रा नाग शिरल्याची घटना शनिवारी (22 जून) घडली. या कोब्रा नागाला पाहून संपूर्ण कुटूंब भयभीत होऊन घराबाहेर पळाले होते. मात्र सर्पमित्र दत्ता यांनी या नागाला शिताफीनं पकडून पिशवीत बंद केल्यानं त्या कुटुंबानं सुटकेचा निश्वास घेतला. तर इतर भागातूनही धामण जातीचे बिनविषारी भलेमोठे तीन साप पकडण्यात आले. तीन दिवसात डझनभर विषारी- बिन विषारी सापांना वस्तीतून सर्पमित्र दत्ता यांनी पकडले.

मानवी वस्ती साप शिरल्यास घाबरू नका? : तीन दिवसात मानवीवस्तीतून पकडलेल्या विषारी आणि बिनविषारी अशा 12 सापांना पकडल्याची माहिती कल्याण वन विभागाला कळवल्यानंतर सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली. तसंच मानवी वस्तीत साप शिरल्यास घाबरून न जाता तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असं आवाहन ही सर्पमित्र दत्ता यांनी नागरिकांना केलंय.

हेही वाचा -

  1. बापरे! मतदान केंद्रात निघाला विषारी साप, मतदार गोंधळले - Lok Sabha Election 2024
  2. जिथं 'खडशिंगी वृक्ष' तिथं सापाला 'नो एन्ट्री'; मेळघाटच्या जंगलात आढळणाऱ्या वृक्षाची काय आहे खासियत?
  3. धक्कादायक! बिस्किट अन् केकच्या पाकिटातून सापांची तस्करी, बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 11 साप जप्त

Last Updated : Jun 25, 2024, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.