नांदेड Prakash Ambedkar On Congress : विधान परिषदेत झालेल्या क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेसच्या सात आमदारांवर कारवाई करणं चुकीचं असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. प्रकाश आंबेडकर हे आज पक्षाच्या मेळाव्यासाठी नांदेडला आले होते, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. "सात आमदारावर कारवाई करणं चुकीचं राहील. यापूर्वी खासदार चंद्रकांत हंडोरे यांना ज्यांनी ज्यांनी पाडलं, त्यांची नावं देखील समोर आली आहेत. त्यांच्यावर कारवाई नको का," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "या कारवाईनंतर काँग्रेसमधील मनुवाद समोर येईल," असं देखील ते म्हणाले.
काँग्रेसमधील आमदारांवर कारवाई करणं चुकीचं : "विधानपरिषद निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस आमदारांनी क्रॉस मत करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची तयारी वरिष्ठ नेत्यांनी सुरू केली. मात्र क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणं चुकीचं आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. विशाळगड प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटकार लगावली. "विशाळगडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, या बद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना विचारावं," त्यांना जनतेनं निवडून आणल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या रॅलीबद्दलही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलण्यास प्रकाश आंबेडकर यांनी टाळलं. "मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक 288जागा लढ्वल्या पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे," असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
अशोक चव्हाण यांनी नुकसान करुन घेतलं - प्रकाश आंबेडकर : "अशोक चव्हाण यांचं काही राहीलं नाही, त्यांनी स्वतःचं नुकसान करुन घेतलं" असं वंचित नेते प्रकाश आंबेडकर म्हणले. कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना त्यांना खामगाव इथून एक फोन आला. फोनवर त्या व्यक्तीशी बोलताना त्यांनी हे संभाषण केलं. प्रकाश आंबेडकर हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत.
आगामी निवडणुकीसाठी पूर्ण तयारी : वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नांदेड शहरातील कवठा परिसरातील सप्तगिरी प्लाझा इथं संपन्न होत आहे. विधानसभेची तयारी वंचितच्या वतीनं सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
वसंत मोरे चर्चा करुन उबाठामध्ये गेले : पुण्याचे आमदार वसंत मोरे हे आपल्याशी चर्चा करुनच उबाठामध्ये गेले. महाविकास आघाडीचा विधानसभेचा फार्म्युला 99 /99/99 असा ठरला आहे. याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली नाही. याबद्दल मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा :
- इंडिया आघाडीला केवळ बहुजनांची मते हवीत, नेतृत्व नको - ॲड. प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar
- मणिपूर हिंसाचारात 'सुपरपॉवर'चे काय झाले? प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर टीका - Prakash Ambedkar Criticized PM Modi
- उज्ज्वल निकम यांच्यावर कोणाचा दबाव होता? ते त्यांनी स्पष्ट करावं; ॲड. आंबेडकर यांचा सवाल - Prakash Ambedkar On Ujjwal Nikam