पुणे : Pune Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेमधून (Pune Lok Sabha ) वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितकडून आणखी तीन लोकांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील लोकसभेचं चित्र आता स्पष्ट झालेलं असून तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) किती ठिकाणी पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र, पुणे आणि बारामती लोकसभेमध्ये त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे वंचित नेमकं कुणाची मतं खाणार आणि त्याचा फटका नेमका कुणाला बसणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कुणाला फटका बसणार : वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना वंचितचा पाठिंबा मिळणार आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना मिळणार आहे. इतर ठिकाणी मात्र मत विभागणी आटळ आहे. त्यामुळे याचा गेल्या वेळेस काँग्रेसला फटका बसला होता. यावेळेस कुठल्या मोठ्या पक्षाला बसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
शिरूर लोकसभेमधून मंगलदास बांदल : वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर खर तर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. लोकसभा लढण्याविषयी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांचीही भेट घेतलेली होती. त्यामुळे वसंत मोरे यांना वंचितकडून तिकीट मिळणारं असं स्पष्ट झालं होतं. अधिकृतपणे आज त्याची घोषणा झाली आहे. शिरूर लोकसभेमधून मंगलदास बांदल यांना वंचितने तिकीट दिलं आहे. त्यामुळे या ठिकाणीही तिरंगी लढत होणार आहे.
हेही वाचा :
1 अमरावतीत आंबेडकर बंधुची खेळी; 'वंचित'चा आनंदराज यांना बिनशर्त पाठिंबा - LOK SABHA ELECTIONS
2 उमेदवारीवरून महायुती-मविआत नाराजीनाट्य; काय आहेत नाराजीची कारणं? - Lok Sabha Elections