ETV Bharat / state

वंचितकडून उमेदवार बदलण्याचा धडाका सुरूच! प्रकाश आंबेडकर यांनी 'या' मतदारसंघातील नेत्याची उमेदवारी केली रद्द - LOK SABHA ELECTION 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Mangaldas Bandal : वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली आहे. दरम्यान, वंचितकडून ही दुसरी उमेदवारी रद्द करण्यात आल्याने नक्की वंचितचं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. (Vanchit Bahujan Aghadi ) यावेळी वंचितने बांदल यांची उमेदवारी का रद्द करण्यात आली, याचं कारणं दिलं आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 6:06 PM IST

वंचितचे मत...

पुणे : Mangaldas Bandal : वंचित बहुजन आघाडीकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. ही उमेदवारी का रद्द केली? यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना उमेदवारी का मागं घेतली याचं कारण समोर आलं आहे. इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली असता, त्या ठिकाणी मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. त्यावरून वंचितवर मोठी टीका होत होती. (Lok Sabha Election 2024) त्याची दखल घेऊन वंचितने आता मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांदल यांची उमेदवारी रद्द का केली : वंचित बहुजन आघाडीकडून शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसंच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथं उमेदवार न देण्याचं धोरण ठरवलं होतं. पण वंचितच्या या धोरणाविरोधात बांदल यांनी भूमिका घेतल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांनी घेतला आहे.

अमरावतीतूनही उमेदवाराची माघार : यापूर्वी वंचितनं अमरावती इथून आपला उमेदवार जाहीर केला होता. प्राजक्ता पिल्लेवान या त्यांच्या उमेदवार होत्या. त्यांनाही अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितनं अर्ज न भरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळं त्यांना या जागेवरही उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. पण याचं कारण म्हणजे अमरावतीतून प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधु आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपाला मदत होऊ नये म्हणून पिल्लेवान यांची उमेदवारी मागे घेत असल्याचं वंचितनं म्हटलं होतं.

यवतमाळ-वाशिम : या लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवलं होतं. यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आल्यानं वंचितला मोठा धक्का बसला.

हेही वाचा :

1 शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकर गरजले - Sharad Pawar

2 आमदार रवी राणांपेक्षा त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा दुप्पट श्रीमंत! - Navneet Rana Property

3 हुश्श! अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची उमेदवारी जाहीर - Devendra Fadnvis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.