ETV Bharat / state

श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची खेळी, 'या' महिला उमेदवाराला कल्याण-डोंबिवली मतदारसंघात उमेदवारी - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Vaishali Darekar : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर केलाय. शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या वैशाली दरेकर यांना कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं वैशाली दरेकर यांची थेट शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी लढत होणार आहे.

LOK SABHA ELECTION
LOK SABHA ELECTION
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 5:03 PM IST

ठाणे Vaishali Darekar : कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटानं उमेदवारी दिलीय. वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना धक्का दिला आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत कधीही चर्चेत नसलेल्या वैशाली दरेकर यांचं नाव अचानक उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Vaishali Darekar
वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाकडून कल्याण-डोंबिवली मतदारसंघात उमेदवारी

2010 साली मनसेच्या नगरसेविका : वैशाली दरेकर या मूळच्या शिवसैनिक आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेतील एक मोठा गट 2009 च्या दरम्यान मनसेबरोबर गेला होता. त्यामध्ये डोंबिवलीतील शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांचाही सहभाग होता. कल्याण डोंबिवली पालिकेत 2010 साली दरेकर मनसेच्या नगरसेविका होत्या. तसंच त्याच्याकडं विरोधी पक्षनेते पद देखील देण्यात आलं होतं. दरेकर यांनी महिला बालकल्याण समितीचं सभापती पद देखील भूषवलंय.

विकास कामं मार्गी लावण्यात हतखंडा : उत्तम वक्त्या म्हणून वैशाली दरेकर यांची ओळख आहे. पालिकेत विरोधी पक्षनेत्या असताना शहरातील अनेक विकास कामं मार्गी लावण्यात त्यांचा पुढाकार होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्वाचे विषय लावून धरत अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतलं होतं. नागरी समस्या, विकास कामांचे विषय मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. मनसेमध्ये त्यांनी प्रदेश पातळीपर्यंत कामं केलंय. शिवसेना, मनसेमध्ये असताना अनेक आंदोलने, उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

वैशाली दरेकरांची मनसेमध्ये कोंडी : गेल्या काळात मनसेमध्ये कोंडी होऊ लागल्यानं त्या मनसेतून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहणं पसंत केलं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या विरुध्द मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यांना एक लाख दोन हजार 63 मते त्यावेळी मिळाली होती. ठाकरे गटात आता त्या सक्रिय आहेत. ठाकरे गटाच्या महिला संघटनेचं पद त्यांच्याकडं आहे. उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या डोंबिवलीकर माहेरवाशीण आहेत. या नाते संबंधातून वैशाली दरेकर यांना ही उमेदवारी मिळाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मातोश्रीच्या खास विश्वासातले ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांचा महत्वाचा सहभाग असल्याचं समजतंय.

हे वाचलंत का :

  1. उबाठा गटाकडून लोकसभेच्या चार जागा जाहीर; उन्मेश पाटलांनी हाती बांधलं 'शिवबंधन' - Lok Sabha Election 2024
  2. उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, भाजपावर टीका करताना म्हणाले,... - Unmesh Patil news
  3. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत का केला प्रवेश? शिवाजी आढळराव पाटील यांनी उघड केलं गुपित - Shivajirao Adhalrao Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.