ETV Bharat / state

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप; उर्मिला कानिटकर, श्रेया घोषालने गाजवला महोत्सव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 8:11 AM IST

Ajanta Ellora Festival 2024 : छत्रपती संभाजीनगरचं वैभव असलेल्या वेरुळ अजिंठा महोत्सवाची सांगता श्रेया घोषाल यांच्या गायनाने झाली. तर श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाज आणि सुरेल गायनाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

Ajanta Ellora Festival 2024
वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव
गायक श्रेया घोषाल यांनी गाजवला महोत्सवाचा समारोह

छत्रपती संभाजीनगर Ajanta Ellora Festival 2024 : सोनेरी महालात आयोजित वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप अविस्मरणीय कार्यक्रमाद्वारे झाला. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी सादर केलेल्या मधुर गायनाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तर समारोपाच्या दिवशीउर्मिला कानिटकर, वैदेही परशुरामी आणि कुमार शर्मा यांच्यासह १० कलाकारांच्या कथ्थक रॉकर्स ग्रुपने कथ्थक नृत्याचे अविस्मरणीय सादरीकरण केलं. त्यात त्यांच्या गुरू आशा जोगळकर यांची विशेष रचना प्रस्तुत केली. या बहारदार नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांना ताल धरून ठेका धरायला भाग पाडलं.

कत्थकने जिंकली मने : उर्मिला कानेटकर, वैदेही परशुरामी आणि कुमार शर्मा यांच्यासह १० कलाकारांच्या कथ्थक रॉकर्स ग्रुपने कथक फ्यूजन, उपज, भगवान शिव आणि शक्ती आधारित, दोन मैत्रिणीच्या गप्पा, तीहाई आणि घोडेस्वारी यासह कुमार शर्मा यांनी रचलेल्या अनेक रचना सादर केल्या. त्याचप्रमाणं ठुमरी आणि विविध प्रसिद्ध रचनांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. नृत्य आणि अभिनय यांच्या सुंदर मिश्रणाने कलाकारांनी प्रेक्षकांना भावविभोर केले. उर्मिला आणि वैदेही यांच्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. अजिंठा महोत्सवाचा समारोपाच्या दिवशी अविस्मरणीय कथ्थक नृत्याचं सादरीकरण झालं. कलाकारांच्या उत्कृष्ट नृत्यानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि त्यांना एका अविस्मरणीय अनुभवाची भेट दिली. कथ्थक सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची वेशभूषा आणि रंगसंगती मनमोहक होती. तसेच कार्यक्रमासाठी भव्य मंच आणि प्रकाश योजनेने त्यात भर टाकली होती. प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा उत्साहाने आनंद घेतला.

श्रेया घोषाल यांनी जिंकली मने : हिंदी आणि मराठी गाण्यांच्या सुरेल मेजवानीने श्रेया घोषाल यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. "तुम क्या मिले", "सुन रहा है ना तू, रो रही हूँ मैं सुन रहा है", "बहारा..", "मन ये साहेबजी..", "आशियाना..", बरसो रे, "मेरे ढोलणा..", "नगाडा..", यांसारख्या लोकप्रिय हिंदी गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर "आली उमलुन माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा", "जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू..", चंद्रा मधील लावणी "थांबला का उंबऱ्याशी, या बसा राजी खुशी..", यांसारख्या मराठी गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेची गोडी अनुभवून दिली. "दिल खो गया, हो गया किसी का अब रास्ता मिल गया, ख़ुशी का आँखों में है ख्वाब सा किसीका", "घर मोरे परदेसिया आओ पधारो पिया..", यांसारख्या गाण्यांद्वारे त्यांनी प्रेक्षकांना रोमँटिक भावनांमध्ये हरवून टाकले. श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाज आणि सुरेल गायनाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या गायनाचा उत्साहपूर्ण आदर केला. अशा प्रकारे, वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप एका अविस्मरणीय आणि मनोरंजक कार्यक्रमाद्वारे झाला. श्रेया घोषाल यांच्या गायनाने हा कार्यक्रम अविस्मरणीय बनला.

हेही वाचा -

  1. वेरुळ-अजिंठा महोत्सवात न्यायाधीशांना उठवलं खुर्चीवरुन; समितीचा जाहीर माफीनामा
  2. Blind Artists Music Show: गणेशोत्सवात अंध कलाकारांच्या स्वरलहरींची धुम, मुंबईत मिळतोय मोठा प्रतिसाद
  3. Voice of Dilip Prabhalkar : बोक्या सातबंडे नाटकातील दिलीप प्रभावळकरांचा आवाज बालप्रेक्षकांचे करतोय भरपूर मनोरंजन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.