ETV Bharat / state

IAS पूजा खेडकर यांच्यावरील आरोपानंतर विद्यार्थ्यांचा संताप; संसदेत चर्चा करण्याची मागणी - IAS Pooja Khedkar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 6:40 PM IST

IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्यावरील एक-एक गंभीर आरोप होत आहेत. त्यानंतर UPSC-MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी विरोधी पक्षानं संसदेत चर्चा करावी अशी मागणी केलीय. तसंच पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.

IAS Pooja Khedkar
IAS पूजा खेडकर (Etv Bharat File Photo)

पुणे IAS Pooja Khedkar : NEET-PG, UGC NET परीक्षा, शिक्षक भरती अशा घोटाळ्यामुळं लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. त्यामुळं देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. NEET-PG परीक्षा परीक्षानंतर महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण देशभरात गाजत आहे. त्यामुळं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत पुण्यातील UPSC-MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी ईटीव्ही भारतनं संवाद साधलाय.

UPSC, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया (ETV BHARAT REPORTER)

नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा वाद : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन तसंच मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. मात्र, निवड झाल्यानंतर त्या वैद्यकीय चाचणीला सतत गैरहजर राहिल्या. खेडकर यांनी 6 वेळा वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिल्याचे आरोप आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या नावावर 17 कोटींची संपत्ती असताना देखील त्यांना नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप आहे.

UPSC च्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह : याबाबत यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनी संताप व्यक्त केला आहे. "आम्ही अनेक वर्षांपासून UPSC चा अभ्यास करत आहोत. ही बाब उघडकीस आल्यावर हुशार, सुशिक्षित तरुणांची जागा बळकावल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. हा प्रश्न पुण्याचा नसून देशाचा आहे. IAS चं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचं यामुळं मोठं नुकसान होत आहे. पूजा खेडकर प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. तसंच विरोधी पक्षानं देखील याबाबत संसदेत चर्चा केली पाहिजे. आज यूपीएससीकडं देशातील सर्वात स्वायत्त संस्था म्हणून पाहिलं जातं, मात्र या प्रकरणामुळं यूपीएससीच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत".

दिव्यांग विद्यार्थ्यांवर अन्याय : "आज या प्रकरणाकडं पाहिलं, तर आयएएस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. त्यांनी दिव्यांगांच्या संदर्भात दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करायला हवी. दिव्यांगाचा गैरफायदा कोणी घेत, असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळं आमच्या दिव्यांगांवर अन्याय होतोय. शासनानं पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अपंग विद्यार्थ्यांना न्याय द्यावा", असं एका दिव्यांग विद्यार्थ्यानं सांगितलं.

'हे' वाचलंत का :

  1. दिव्यांग असल्याचं सांगून पूजा खेडकर झाल्या IAS? खेडकर आहेत 17 कोटींची संपत्तीच्या मालकीण - IAS Officer Pooja Khedkar
  2. पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा ; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस उपायुक्तांवर टाकला दबाव - Pooja Khedkar Tried To Pressure DCP
  3. आयएएस पूजा खेडकरांच्या आईची पिस्तूल घेऊन दमदाटी, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दिलं स्पष्टीकरण - IAS Pooja Khedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.