छत्रपती संभाजीनगर Muharram 2024 : सर्व जगात मोहर्रम पाळला जातो. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा दिवस पाळला जातो. मुस्लिम धर्मातील परस्पर विरोधी असलेले शिया आणि सुन्नी हे दोन पंथ एकत्र येतात, असं असलं तरी त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे वाद होत नाहीत. तर दुसरीकडं या कार्यक्रमाच्या नियोजनात पोलीस किंवा जिल्हा प्रशासन कुठलंही नियोजन करत नसून मुस्लिम धर्मीय स्वतः शांततेत कार्यक्रम व्हावा यासाठी नियोजन करतात अशी माहिती माजी महापौर तथा अलम बरदार कमिटीचे अध्यक्ष रशीद मामू यांनी दिली. हा दिवस तीन घटनांसाठी महत्वाचा मानला जातो, मोहर्रम या दिवसापासून मुस्लिम धर्मियांचं नवीन वर्ष सुरू होतं अशी माहिती मुस्लिम अभ्यासक नौशाद उस्मान यांनी दिली.
नवीन वर्षाची सुरुवात : इस्लामिक कॅलेंडरनुसार मोहर्रमला नवीन वर्षाची सुरुवात होते. 10 जुलै रोजी शहरात 'यौम-ए-आशूरा' साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शहरात 139 सवाऱ्यांचा मजमा शहरातील सिटी चौकात भरतो. त्याचप्रमाणे शियापंथीय बांधवांकडून मातमी जुलूसचं आयोजन करण्यात येतं. सुन्नी बांधव अत्यंत आदरपूर्वक शियापंथीय बांधवांच्या जुलूसचा आदर करत त्यांना सन्मानानं वाट मोकळी करुन देतात. शिया लोकांनी मोहम्मद पैगंबर यांचे नातू उमाम हुसैन यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर प्राचीन काळापासून केला जातो. आजच्या दिवशी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळत दुःख मनवतात. तर सुन्नी पंथाचे भाविक त्याचवेळी शहरात विविध ठिकाणी सवाऱ्या काढतात. जुन्या काळी वेगवेगळ्या प्रकारचे नवस सवारी जवळ करण्याची प्रथा होती. लावण्यात आलेल्या सवाऱ्या, मोहर्रमच्या एक दिवस आधी उठून गस्त घालत सकाळी सिटी चौक येथे पोहचतात, ढोल-ताशांच्या गजरात या सवाऱ्यांसोबत शेकडो मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.
सिटी चौक इथं मजमाचं आयोजन : दोन्ही पंथातील बांधव सिटी चौकात एकत्र येतात. सिटी चौक इथं 'मजमा'चं आयोजन करण्यात येतं. जुन्या परंपरेनुसार अलम बरदार समिती आणि पोलीस आयुक्तालयातर्फे सवाऱ्यांचं आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात येतं. इमाम हुसैन व इमाम हसन यांच्या आठवणीत शहरात विविध ठिकाणी सरबत वाटप, अन्नदानही करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कायक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
शहरात 400 वर्षांची परंपरा : शहरात मोहर्रम 400 वषापासून पाळला जातो. सिटी चौक भागात दोन्ही समाज आमने-सामने येतात. आजपर्यंत यांच्यात कधीही वाद किंवा भांडण झालेलं नाही. या कार्यक्रमात सुरुक्षा व्यवस्था किंवा अन्य व्यवस्थेसाठी पोलिसांचा सहभाग घेतला जात नाही. मुस्लिम समाजातील दोन पंथ एकत्र येऊन नियोजन करतात. जगात अशी प्रथा असणारं संभाजीनगर हे एकमेव शहर आहे, अशी माहिती माजी महापौर तथा अलम बरदार कमिटीचे अध्यक्ष रशीद मामू यांनी दिली. दोन्ही समाज एकमेकांचा आदर करत आपलं व्यासपीठ उपलब्ध करुन देतात. शिया बांधव मातम म्हणजेच इमाम हुसेन यांच्या आठवणीत दुःख व्यक्त करतात. सुन्नी मुस्लिम सवाऱ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त करतात असं म्हणतात. मात्र, काही वर्षात सवारी काढण्याचं प्रमाण कमी झाल्याचं अभ्यासकांनी सांगितलं.
शिक्षण घेण्याचा सल्ला : प्राचीन काळापासून अनेक समाजात काही चालीरीती चालत आल्या आहेत. त्याच्याच आधारे प्रथा परंपरेनुसार मोहर्रम पाळला जातो. मात्र, आगामी काळामध्ये समाजातील गोरगरिबांनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं, अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. व्यसनापासून दूर राहिलं तर अख्ख कुटुंब सुरक्षित राहील. त्यामुळं आम्ही या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश देत असल्याचं रशीद मामू यांनी सांगितलं.
हेही वाचा :