मुंबई - जगभरातील आज अनेक देशात युद्धासारखी परिस्थिती आहे. रशिया-युक्रेन युद्धाची झळ अजूनही शांत झालेली नाही. देशासह जगभरात मोठ्या प्रमाणात मानवी जीवनात तिरस्कार, द्वेष, वाद यांसारखे वातावरण आहे. सूड, तिरस्कार आणि द्वेष नष्ट व्हावेत आणि त्याची जागा प्रेम, शांतता आणि सुखाने घ्यावी, यासाठी रविवारी मुंबईत "मैत्रीबोध परिवारा"तर्फे "एक भारत हम भारत" या संकल्पनेखाली पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही पदयात्रा ओव्हल मैदान ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात आलीय. या पदयात्रेत अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते. अभिनेत्री स्मिता जयकर, अभिनेत्री अदिती पोहनकर, अभिनेत्री काजल अग्रवाल आदी सिने सृष्टीतील कलाकार सहभागी झाले होते. या पदयात्रेत हजारो मुंबईकरांनी सहभागी होत पदयात्रेचा उत्साह वाढवला होता.
विश्वात शांतता नांदावी : आज आपला भारत देश असो किंवा पूर्ण विश्व असू देत सगळं काही विखुरलेलं आहे, त्याचं विभाजन झालेलं आहे. आपल्या देशात किंवा जगात पूर्वी असं कधी घडलेलं नव्हतं. भारत देश हा एकसंघ होता. आज जगात बघतोय कुठे युद्ध सुरू आहे, तर कुठे आणखी काही वाद सुरू आहेत. ही संतांची भूमी आहे. सर्वजण इथे गुण्यागोविंदाने नांदत होते. आज देशात आणि जगात सगळ्यांना असुरक्षितता वाटत आहे. भीती वाटत आहे. त्यामुळे जगात आणि भारत देशात प्रेम आणि शांतता नांदावी यासाठी आज आम्ही मैत्री बोध परिवारातर्फे पदयात्रा काढली आहे, असं माध्यमाशी संवाद साधताना अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सांगितले.
प्रेम आणि शांतीचा संदेश : तसेच आम्ही जगात आणि देशात शांतता नांदावी, एकमेकांमध्ये सलोख्याचे संबंध राहावे, प्रेमाची देवाणघेवाण व्हावी, यासाठी प्रेम आणि शांतीचा संदेश आम्ही दिलाय. माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज देशांमध्ये किंवा जगात पाहतोय सर्वजण एकमेकांचा द्वेष, तिरस्कार करताहेत. म्हणून आम्ही "एक भारत हम भारत" ही संकल्पना घेऊन सर्वांमध्ये प्रेम, शांतता नांदावी, देश आणि जग एकसंघ राहावे, सुखाने राहावे, विश्वास शांतता निर्माण व्हावी, यासाठी आम्ही लोकांमध्ये शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देतोय. शेवटी आपण एकत्र राहिलो तरच "एक भारत हम भारत" असं म्हणू शकतो. त्यामुळं लोकांनीही आमच्यात सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केलंय.
भीतीचे वातावरण नष्ट झालं पाहिजे : आज मानव विश्वास भीतीचे वातावरण आहे. असुरक्षिततेचा वातावरण आहे. प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. शांतता आणि प्रेम याची गरज आहे. ती उणीव कुठेतरी भाषत आहे, म्हणून ती उणीव दूर आम्ही करण्यासाठी आज मैत्रीबोध परिवारातर्फे पदयात्रा काढली आहे. प्रेमाची आणि शांततेची ही मानवी साखळी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. जसे थेंब थेंब तळे साचे, तसे आम्ही शांततेचा आणि प्रेमाच्या थेंबा थेंबाने समुद्र करण्याचा प्रयत्न करीत आहोत. देशात आणि जगातील भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी आणि मानवी जीवनात एक प्रेमाचा आणि शांततेचा संदेश देण्यासाठी आम्ही मैत्रीबोध परिवारातर्फे "एक भारत हम भारत" असा संदेश देत आहोत. कारण आम्ही सर्वजण एक आहोत ही भावना मनामध्ये जागृत झाली पाहिजे. तरच आम्ही प्रेमाने आणि शांततेने आयुष्य जगू शकतो. आणि तेव्हाच "एक भारत हम भारत" असं म्हणता येईल. मी आज या पदयात्रेत पहिल्यांदा सहभागी झाले, पण लोकांचा उत्साह बघून मला खूप आनंद झाला आणि मुंबईकरांनी, लोकांनी अशा पदयात्रेत किंवा अशा उपक्रमात सहभागी व्हावं, असं मी आवाहन करते, असं यावेळी अभिनेत्री अदिती पोहनकर हिने म्हटलंय. तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकसंघ राहिले पाहिजे, आपल्या सर्वांमध्ये शांतता, प्रेमाची, एकतेची भावना जागृत झाली पाहिजे आणि याच भावनेतून आपण पुढे गेलो पाहिजे, असे यावेळी अभिनेत्री काजल अग्रवाल हिने सांगितलं.
हेही वाचा-