रत्नागिरी Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. रत्नागिरी लोकसभा मतदार संघात अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. यावेळी त्यांनी "ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत म्हणून खासदार विनायक राऊतांनी या भागात काम केलं नाही. काम न केल्यानं पन्नास टक्केहून अधिक निधी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मला विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे," असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.
किमान अडीच लाख मतांनी विजय अपेक्षित : मला किमान अडीच लाख मतांनी विजय अपेक्षित आहे, असं विधान केंद्रीय मंत्री, भाजपा नेते नारायण राणे केलं आहे. चिपळूणमधल्या पेढांबे इथं झालेल्या सभेत ते बोलत होते. त्यामुळे एकप्रकारे महायुतीचे उमेदवार नारायण राणेच असणार असे संकेत यामुळे मिळत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पण भाजपानं मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सभांचा धडाका लावला आहे. सोमवारी चिपळूण तालुक्यातील पेढांबे इथं त्यांची सभा झाली.
विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त करायचं : खासदार विनायक राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. विनायक राऊत यांचं डिपॉझिट मला जप्त करायचं आहे. ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत म्हणून खासदार विनायक राऊतांनी या भागात काम केलं नाही. काम न केल्यामुळे पन्नास टक्केहून अधिक निधी शिल्लक आहे, अशी टीका यावेळी राणे यांनी केली. तसेच जीवनात सगळी पदं रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत. त्यामुळे मला विजय अडीच लाख मतांनी अपेक्षित असल्याचं राणे यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव : यावेळी राणे म्हणाले की, "जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला नगरसेवक ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली, अशी आपली भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. देशाला विकासाच्या दिशेनं नेण्याचं मोठं काम केलं आहे. भारत अर्थव्यवस्थेत 3 ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्रिक करण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्या. यामध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचा खासदार अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजयी झाला पाहिजे. यामध्ये चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे मोठे योगदान असेल," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :