ETV Bharat / state

उजनी धरणात बोट बुडाल्यानं सहा जण बेपत्ता, धाडसानं पोहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे वाचले प्राण - Ujani dam news

उजनी धरणात बोट उलटल्याची मोठी दुर्घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. दुर्घटनेत एकाचे प्राण वाचले आहेत. तर सहा जण बुडाले आहेत. त्यांचा सलग दुसऱ्या दिवशी शोध घेतला जात आहे.

Ujani dam news
उजनी धरण दुर्घटना (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 8:18 AM IST

Updated : May 22, 2024, 10:27 AM IST

सोलापूर: उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. यामधील सहा प्रवास करणारे धरणात बुडाले आहेत. त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. धरणात बुडालेल्या सहा जणांचा शोध घेण्याकरिता रात्रभर शोधकार्य सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशी आज शोधकार्य सुरू आहे. बोटीत राहुल डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक होते. त्यांनी बोट उलटल्यानंतर धाडसाने पोहत धरणाचा काठ गाठून जीव वाचवला. बोटमधील वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्यानं ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे

दोन चिमुकल्यांसह चार जण बुडाले-उजनी धरणात बुडालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं आश्चर्यकारकरित्या प्राण वाचले. त्यांनी बोट धरणात बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रशासन बोटमधील प्रवाशांचा मंगळवारी सायंकाळपासून उजनी धरणात शोध घेत आहेत. गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.

वादळी वारा सुटल्यानं बुडाली बोट- सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा जि सोलापूर) ते कळाशी (ता. इंदापूर जि पुणे) या दरम्यान प्रवाशी बोट उलटली आहे. वादळी वारा आल्यानं प्रवासी बोट हेलकावे खात उलटली आहे. दुर्घटनेत झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव (ता. करमाळा) येथील दोघे, असे सहाजण बुडाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे जात होती. बोट मध्ये कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. बोट धरणातून इंदापूरकडे जाताना जोरदार वादळी वारा सुटला. वाऱ्यामुळे बोट हेलकावे खात पाण्यात उलटली. कुगाव (ता करमाळा,जि सोलापूर) ते कळाशी(ता इंदापूर,जि सोलापूर) दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणतः ही बोट १० ते १५ फेऱ्या मारते. मात्र, मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली.

हेही वाचा-

  1. फिरण्यासाठी गेलेल्या मुलांचा पाण्याचा अंदाज चुकला, पाच जणांचा भावली धरणात बुडून मृत्यू - Nashik drowning incident

Last Updated : May 22, 2024, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.