ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंना धक्का, माजी आमदार कांबळेंचा शिंदे शिवसेनेत प्रवेश - Split in ShivSena

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत भाऊसाहेब कांबळे यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश केला. ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना गटाचे संभाव्य उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात लढण्यास इच्छुक आहेत.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना धक्का
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 6:58 PM IST

अहमदनगर Uddhav Thackeray : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार राहिलेले भाऊसाहेब कांबळे यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिर्डीत लोखंडे ऐवजी दोन भाऊसाहेबांमध्ये लढत होणार का? या चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिंदेंच्या हस्ते कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश : माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. गुरुवारी मुंबईमध्ये भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर शिंदे यांच्या हस्ते कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

कांबळेंची कारकीर्द : भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूरचे दोनदा आमदार राहिले आहेत. त्यांनी 2019 मध्ये कॉंग्रेस कडून शिर्डी लोकसभा निवडणूकही लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी मतदार संघात शिव संपर्क यात्रा पार पडली. यावेळी भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली. यासह त्यांनी शिर्डीत झालेल्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही हजेरी लावली होती.

शिर्डीची जागा कोणाकडे जाणार : आता भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल तीव्र नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिर्डीची जागा बहुधा भाजपा किंवा मनसे यांच्याकडे जाऊ शकते. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा पक्षसुद्धा शिर्डीमधून उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहे.

हेही वाचा:

  1. बारामतीनंतर आता रावेरमध्येही खडसे विरुद्ध खडसे? नणंद-भावजयीत लढतीची शक्यता - Raver Lok Sabha Constituency
  2. निवडणूक रोखे घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक - PM Narendra Modi
  3. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; 'आप' आज करणार देशभरात आंदोलन - ED Arrested Arvind Kejriwal

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.