ETV Bharat / state

हुकूमशहांचं डिपॉझिट जप्त करणारा विजय हवा : उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Uddhav Thackeray On Pm Modi - UDDHAV THACKERAY ON PM MODI

Uddhav Thackeray On Pm Modi : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याला हुकूमशहाचं डिपॉझिट जप्त करणारा विजय हवा, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी पालघर इथं केलं.

Uddhav Thackeray On Pm Modi
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 1:25 PM IST

पालघर Uddhav Thackeray On Pm Modi : पालघरमध्ये एका बाजूला आदिवासी समाज आहे. तर दुसऱ्या बाजूला कोळी समाज आहे. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं वाढवण बंदर मी होऊ देणार नाही. मोर्वे बंदरही होऊ देणार नाही, असा दृढनिश्चय शिवसेना उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभा उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ शिवसेना गटप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन मंगळवारी सायंकाळी वसई पश्चिम-माणिकपूर येथील वायएमसीए मैदानावर करण्यात आलं होतं. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा चांगलाच समाचार घेतला.

Uddhav Thackeray On Pm Modi
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Reporter)

मच्छीमारांना कर्जाच्या नावे केलं जाते ब्लॅकमेल : इथल्या मच्छीमारांना कर्जाच्या नावे ब्लॅकमेल केलं जात आहे. परंतु येणाऱ्या 20 दिवसानंतर भाजपाचं हे कर्ज व्याजासहित फेडून दाखवू. तेव्हा घाबरू नका, असा सबुरीचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मच्छीमार बांधवांना दिला. वसईतल्या गुंडागर्दीवरही त्यांनी परखड वक्तव्य केलं. भाजपा स्वत:सोबतच दुसऱ्याची मतं फोडण्याकरता अन्य पक्षाचा उमेदवार उभा करतो. त्यामुळे अशीच शिट्टी वाजते. आपल्याला वाटतो या पक्षाचा उमेदवार हा त्यांच्याविरोधात आहे. पण आता मत नासवू नका, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीचा नामोल्लेख टाळत भाजपाचा समाचार घेतला.

ही लढाई तुमची आहे : "ही लढाई तुमची आहे. ही लढाई सरळ सरळ लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. तुमच्या आयुष्याची लढाई आहे. तुमच्या भावी पिढ्यांसाठी म्हणून ही लढाई मी लढत आहे. उद्धव ठाकरे म्हणून मी माझी लढाई लढत नाही. तुमची आणि तुमच्यासाठीची ही लढाई आहे, तुमच्या भरोशावर, तुमच्या जोरावर आणि आशीर्वादावर मी ही लढाई लढत आहे. मोदी-शाहांविरोधातील ही घट्ट मतं एकत्रित करुन त्या घट्ट हातांत मशाल पेटली पाहिजे."

हुकूमशहांचं डिपॉझिट जप्त करुन विजय हवा : "भारतीताईंसारखी तुमच्यातलीच एक महिला आहे. आदिवासी समाजातील, तुमच्या प्रश्नांची जाण असलेली महिला आहे. त्यांचा आवाज लोकसभेत घुमला पाहिजे. तुमच्या व्यथा-प्रश्नांना त्याच लोकसभेत वाचा फोडू शकतील," असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. "आजपर्यंत आम्हीही बाहेरून आललं पार्सल स्वीकारलं होतं. आता भाजपाला सावरायला कुणीच नाहीये. म्हणून कुणाला तरी उभं केलं आहे. आता चुकू नका. आपल्याला विजय हवा आहे. पण तो साधासुधा विजय नको. हुकूमशहांचं डिपॉझिट जप्त करुन विजय हवा. हा विजय तुमचा असणार आहे. तुम्हीच तुमच्या विजयाचे शिल्पकार असणार आहात," अशी आर्त साद सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांनी पालघरसह वसई-विरारकरांना घातली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान : "देशाचे प्रधानसेवक त्यांच्या पक्षाचा प्रचार करत असतील, तर ते आमच्या भारतीताईंच्या प्रचाराला का येत नाहीत? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला प्रधानसेवक म्हणवतात, पण सोयी मात्र सगळ्या पंतप्रधानपदाच्या घेतात. नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्था आणि त्यामुळे जनसामान्यांना होणाऱ्या त्रासावर ठाकरे यांनी बोट ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक असतील तर त्यांनी ट्रेननं फिरून दाखवावं," असं आव्हानही ठाकरे यांनी दिले. "विशेष म्हणजे देशाची निवडणूक येईल, तेव्हा देशाच्या पंतप्रधानानं राजीनामा दिला पाहिजे. त्यावेळी राष्ट्रपती राजवट देशात लागू केली पाहिजे," या हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनाचीही उपस्थिताना आठवण करुन दिली.

अमित शाह यांना खुलं आव्हान : "पालघरला भेकड पक्षाचे नेते आले होते. त्यांनी शिवसेना नकली असा उल्लेख केला. पण जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. ज्यांना अकल असते, त्यांना एकदा सांगितलेलं कळते. यांना कळतच नाही, म्हणून हे बेअकली आहेत," असा प्रतिटोला उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना लगावला. "या प्रश्नावर बोला, त्या प्रश्नावर बोला, असं ते म्हणाले. पण तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावर या. मी जे प्रश्न विचारेन त्याची उत्तरे द्या," असं खुलं आव्हानही ठाकरे यांनी अमित शाह यांना या प्रसंगी दिलं.

मोदी-शाहांनी लूटून नेलेलं वैभव पुन्हा आणणार : 'इंडिया' आघाडीचं सरकार आल्यानंतर मोदी शाहांनी लूटून नेलेलं वैभव पुन्हा आणणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. "गुजरातबद्दल आकस नाही. त्यांच्या हक्काचं आम्ही त्यांना देऊ. पण महाराष्ट्राच्या हक्काचा घास तोंडातून काढून घेणार असाल, तर तुमचा मत मागणारा हात कापल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रानं पंतप्रधान मोदींना भरभरून दिलं. पण त्यांचाच हे घात करतात आणि पुन्हा निर्लज्जपणानं मतं मागायला येतात. मोदी-शाह येत्या दोन दिवसात मुंबईत रोड शो करणार आहेत. याचाच अर्थ त्यांनी आताच आपल्याला रस्त्यावर आणलेलं आहे. मन की बात करण्याऐवजी जन की बात करा. लोक कसं राहतात, हे बघा," अशी टीकाही ठाकरे यांनी या वेळी केली.

हेही वाचा :

  1. "मुंबई लुटणार्‍या घोटाळेखोरांना...", देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी - Devendra Fadnavis
  2. निवडणुकीपूर्वी राम राम, निवडून आल्यावर मरा-मरा; उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागली तोफ - Lok Sabha Election 2024
  3. शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर...; प्रकाश आंबेडकरांचा सर्वात मोठा दावा - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.