ETV Bharat / state

पुण्यात झिकाचा प्रादुर्भाव, एरंडवण्यात डॉक्टरसह मुलीला झिकाची लागण - Zika Virus Patients - ZIKA VIRUS PATIENTS

Zika virus patients in Pune : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यातील डॉक्टरसह त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर आरोग्य विभाग बारकाईनं लक्ष ठेवत आहे.

Zika Virus
झिका विषाणू (source : UN Website)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 4:52 PM IST

पुणे Zika virus patients in Pune : पुण्यात प्रथमच झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे एरंडवणात झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरसह त्यांच्या मुलीला झिकाची लागण झाली आहे. दोघांनाही ताप, अंगावर लाल चट्टे असल्याची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. या दोघांवरही उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. पण त्यांच्यावर पुणे आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवलं जात आहे.

डॉक्टरांच्या मुलीलाही झिका व्हायरसची लागण : 18 जून रोजी रुग्णांच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्यानंतर त्यांना 20 जून रोजी झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डॉक्टरांच्या मुलीलाही झिका व्हायरसची सौम्य लक्षणे दिसून आली. तिच्या रक्ताचं नमुनेही तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडं पाठवण्यात आले होते. अहवालानंतर तिलाही झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.

दोघांची प्रकृती स्थिर : झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर डॉक्टरसह त्यांच्या मुलीवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं या दोघांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची तपासणी केलीय. तथापि, या व्यक्तींमध्ये झिका विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. या सर्वांवर आरोग्य विभागाचं बारीक लक्ष आहे.

परिसरात औषध फवारणी सुरू : झिका हा एडिस इजिप्ती डासामुळं होतो. त्यामुळं महापालिकेच्या आरोग्य विभागानं रुग्ण आढळलेल्या परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे. त्याचबरोबर डास उत्पत्तीची ठिकाणं शोधून नष्ट केली जात आहेत. तसंच परिसरातील घरांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रक्ताचे नमुने गोळा करण्यात येत आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवा : किशोरी पेडणेकर; तर किरण शेलारांना जिंकण्याचा विश्वास - Graduate Constituency Election 2024
  2. लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवा : किशोरी पेडणेकर; तर किरण शेलारांना जिंकण्याचा विश्वास - Graduate Constituency Election 2024
  3. "दाढीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम करणार"; विधानसभेसाठी भाजपा आमदाराला सख्ख्या भावाचं आव्हान - Shekhar Gore Vs Jaykumar Gore

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.