ETV Bharat / state

कोल्हापुरात जुडवा पोलीस कर्मचारी; ओळखताना अनेकांचा उडतोय गोंधळ, साहेबांचीही होते तारांबळ

Twin Police Constable : जगात एक सारखे दिसणारे अनेक चेहरे असतात. मात्र, एक सारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती समोर दिसल्या की, गोंधळ उडतो. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे (laxmipuri police Station) सध्या जुडवा दिसणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलमुळं चर्चेत आहे. सुहास सर्जेराव पाटील आणि पंढरीनाथ इश्राम सामंत हे दोघेही ठाणे अंमलदार आहेत. त्यांच्याबाबतीत रोज मजेशीर घटना घडत आहेत.

Twin Police Constable
जुडवा पोलीस कर्मचारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 4:50 PM IST

कोल्हापूर Twin Police Constable : एकसारखी चेहरापट्टी, एक सारखी उंची, दोघांनीही अंगावर खाकी परिधान केली की, समोरच्याला बुचकळ्यात टाकणारी स्थिती सध्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात (laxmipuri police Station) पाहायला मिळत आहे. पोलीस कर्मचारी सुहास पाटील (Police Constable Suhas Patil) आणि पंढरीनाथ सामंत (Police Constable Pandharinath Samant) या एक सारख्या दिसणाऱ्या दोघा पोलिसांचे गोंधळ उडणारे अनेक किस्से सध्या कोल्हापूर पोलीस दलात ऐकायला मिळत आहेत. या दोघांच्या दिसण्याची, बोलण्याची आणि एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असण्याची चर्चा सध्या कोल्हापूर शहरात रंगली आहे.

'तो' मी नव्हेच...: सुहास सर्जेराव पाटील (बक्कल नंबर ७१७ रा. कसबा बावडा) आणि पंढरीनाथ इश्राम सामंत (बक्कल नंबर २५६ रा. चांदे, ता. राधानगरी) हे दोघेही ठाणे अंमलदार आहेत. दोघेही एकसारखे दिसत असल्यानं पोलीस निरीक्षकांपासून पोलीस ठाण्यात येणाऱ्या अनेकांची मजेशीर फसगत होते.‌ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी सामंत यांना काही काम सांगितलं आणि सुहास समोर आला तर मगाच्या कामाचं काय झालं अशी विचारणा ते करतात. त्यामुळं 'तो' मी नव्हेच अशी सांगायची वेळ दोघांवरही येते. त्यामुळं अनेकजणांची या दोघांच्या चेहरेपट्टीवरुन फसवणूक होते. तर पोलीस ठाण्यातील सहकारीही त्यांची नेम प्लेट पाहूनच त्यांना ओळखत आहेत.

सामाजिक काम करत असताना अनेक वेळा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये येण्याचा योग आला. गेल्या दोन वर्षात सुहास पाटील आणि पंढरीनाथ सामंत यांच्या एकसारखेपणामुळे अनेकदा दोघांपैकी काम कुणाकडे आहे हेच लक्षात यायचे नाही. एक दिवस सुहास पाटील यांना भेटून गेलो तर दुसऱ्या दिवशी पंढरीनाथ सामंत समोर यायचे आणि त्यांनाच कामाबाबत विचारणा केली आहे असं योगायोगाने दोन वर्षात अनेकदा घडलं आहे. - संदीप गुरव, सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर

गेली 22 वर्षे कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे. माझ्या सेवाकाळातील दोन वर्षांचा कार्यकाल कोल्हापूर शहरातल्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पूर्ण होत आला आहे. माझा सहकारी पंढरीनाथ सामंत आणि मी एक सारखे दिसत असल्यामुळे बऱ्याचदा अनेक जणांची फसगत होते. - सुहास पाटील, ठाणे अंमलदार लक्ष्मीपुरी पोलीस

माझ्या आणि सुहास पाटील यांच्या दिसण्यात बरेच साम्य आहे. आमच्या कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार पोलीस स्टेशनमध्ये भेटायला आल्यानंतर एक सारखेपणाला अनेक जण हा आपला मित्रच आहे म्हणून नावानिशी हाक मारतात. अनोळखी व्यक्ती दिसल्यानंतर हेही आपल्या एकसारखे दिसण्याला असले अशी भावना निर्माण होते. मात्र या गोष्टीचा कोणताही त्रास होत नाही, अनेकदा वरिष्ठ अधिकारीही आमच्या दिसण्याला फसले आहेत. - पंढरीनाथ सामंत, ठाणे अंमलदार, लक्ष्मीपुरी पोलीस

जुडवा कॉन्स्टेबल : पोलीस ठाण्यात आलेले सर्वसामान्य नागरिक तक्रार घेऊन आले तर यातील एकाला भेटतात. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला कालच्या कामाचं काय झालं म्हणून विचारतात. त्यामुळं या दोघांबरोबरच नागरिकांचाही चांगलाच गोंधळ उडत आहे. पोलीस ठाणे हे गुन्हेगार, मारामारी, वादावादी यासारख्या नकारात्मक गोष्टींनी भरलेली जागा असते. मात्र, या दोघांच्या तिथे असण्यानं "अरे जुडवा कॉन्स्टेबल आहेत बघ" असं म्हणत त्यांना पाहणारे थोडा वेळ सुखद अनुभव घेत आहेत.

त्यांना नाही, तुम्ही मला काम सांगितलं : एखादा नागरिक काय साहेब परवा दाखला तुम्हीच दिला की, विसरला होय आम्हाला. असं म्हणताच या दोघांपैकी एकाला अहो, त्यांना नाही तुम्ही मला काम सांगितलं होतं असं पटवून द्यावं लागतं. विशेष म्हणजे सुहास पाटील यांचे मामाच या दोघांना पाहून फसले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये सेवेत असलेले सुहास पाटील आणि पंढरीनाथ सामंत हे एकसारखे दिसत असल्यानं अनेकांची फसगत होत आहे.

आपटे मॅडम ही फसल्या : जगात एक सारखे दिसणारे अनेक चेहरे असतात. मात्र, एक सारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती समोर दिसल्या की, गोंधळ उडतो. दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या एक सारख्या दिसण्यावरून करवीर पोलीस ठाण्यातील अधिकारी आपटे यांचाही गोंधळचं उडाला. सुहास पाटील हे करवीर पोलीसात कार्यरत होते. एके दिवशी काही कामानिमित्त ते बाहेर गेले आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचं काम घेऊन पंढरीनाथ सामंत करवीर पोलिसात गेले, तेव्हा आपटे यांनी अरे सुहास एका दिवसात इतका बारीक कसा काय झालास? असा प्रश्न उपस्थित केला, याचं स्पष्टीकरण देताना पंढरीनाथ यांनाही हसू अनावर झालं असल्याचा किस्सा सामंत यांनी सांगितला.

हेही वाचा -

  1. कॅटचा गृह विभागाला दणका; नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी जी शेखर यांची बदली रद्द
  2. नारी शक्ती! पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंतच्या पहिल्याच मेट्रोचं स्टेअरिंग महिला पायलटच्या हाती
  3. आली रे आली 'लालपरी' आली! तब्बल 76 वर्षांनी कोल्हापुरातील मानेवाडीत आली एसटी बस, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केलं स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.