ETV Bharat / state

ताडोबात आढळले वाघांचे मृतदेह ; मृत्यूचं गूढ कायम, एकाच्या मृतदेहाचे तोडले लचके - मृत्यूचं गूढ कायम

Two Tiger Died In Tadoba : ताडोबात दोन वाघ मृतावस्थेत आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हे दोन्ही वाघांचा मृतदेह एकमेकांच्या जवळच पडलेला आढळून आला आहे. मात्र यातील एका वाघाच्या मृतदेहाचे लचके तोडल्याचं दिसून आलं आहे.

Two Tiger Died In Tadoba
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 11:12 AM IST

Updated : Jan 23, 2024, 12:22 PM IST

चंद्रपूर Two Tiger Died In Tadoba : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरक्षेत्रात दोन वाघ आजूबाजूला मृतावस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही वाघांवर अनेक जखमा असून एका वाघाच्या शरीराचा भाग खाल्ला गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं ही घटना नेमकी कशी झाली असावी, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याचा शोध घेण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे व्यवस्थापन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि आजूबाजूच्या परिसरात लागेल्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या तपासणीत खरं कारण स्पष्ट होणार आहे.

दोन वाघ आढळले मृतावस्थेत : राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या ही ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प इथं आहे. वाघांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत त्यांचा अधिवास कमी पडत आहे. अशावेळी आपल्या अधिवासावर वर्चस्व प्रस्थापित करण्यात वाघांमध्ये मोठ्या झुंजी होतात. यात या वाघांचा मृत्यू देखील होतो. ताडोबा अंधारी व्याघ्रपकल्पाच्या कोअर क्षेत्रात येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्र इथं सोमवारी वन कर्मचारी गस्तीवर असताना खातोडा तलावाच्या परिसरात दोन वाघ मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी पाहणी केली असता, T140 नर आणि त्याच्या बाजूला T92 वाघिणीचा छावा मृतावस्थेत आढळून आला. T140 वाघाचं वय हे अंदाजे सात तर बछडा हा अंदाजे तीन वर्षांचा आहे. या दोन्ही वाघांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे.

मृत्यूचं गूढ कायम : सहसा दोन वाघांच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू होतो, तर दुसरा जखमी होतो. मात्र या घटनेमध्ये दोन्ही वाघांचा आजूबाजूलाच मृत्यू झाला आहे. त्यांच्या शरीरावर झुंजीच्या अनेक जखमा आहेत. याहूनही अधिक साशंकतेचं कारण म्हणजे तीन वर्षाच्या बछड्याच्या शरीराचा काही भाग हा खाण्यात आला आहे. हा शरीराचा भाग नेमका कोणी खाल्ला असावा, याबाबत अनेक कयास लावले जात आहेत.

असा आहे अंदाज : हे दोन वाघ आपसात झुंजले की तिसऱ्याच वाघानं या दोघांना मारलं? बछड्याच्या शरीराचा भाग दुसऱ्या वाघानं खाल्ला असावा, असा अंदाज आहे. या दोन वाघांच्या मृत्यूच्या वेळेतही तफावत असू शकते. या दोन वाघांव्यतिरिक्त तिथं तिसरा शक्तिशाली वाघ असण्याची शक्यता आहे. त्यानं त्याच परिसरात या दोन्ही वाघांना मारल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

डीएनए चाचणीमधून होणार उकल : ईटीव्ही भारतच्या सूत्रांनुसार या घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून या परिसरातून वाघांच्या डरकाळ्याचे आवाज वनविभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी गस्तीवर असताना ऐकले होते. मात्र ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यानं त्यांनी यात हस्तक्षेप केला नाही. हा परिसर कोअर क्षेत्रात येत असल्यानं आजूबाजूला कुठंही मानवी वस्ती नाही. त्यामुळं शिकार करण्याची देखील शक्यता नाही. जिथं घटना घडली, त्याच्या आजूबाजूला कुठल्याही अन्य प्राण्यांची हालचाल ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघांची हालचाल कैद झाली आहे. वाघांच्या शरीराचा भाग दुसऱ्या वाघानं खाल्ला असल्याची शक्यता आहे. त्यामुळं शवविच्छेदनात पोटातील अंशाचे देखील नमुने घेतले आहेत. याचे डीएनए नमुने देखील तपासणीसाठी पाठविले आहेत. ट्रॅप कॅमेरे, डीएनए चाचणी आणि शवविच्छेदन अहवाल, यातून ही घटना कशी घडली हे स्पष्ट होणार आहे.

शर्थीचे प्रयत्न सुरू : ही घटना घडल्यानंतर त्वरित तपास सुरू करण्यात आला आहे. नेमकं कारण काय आहे, हे तपासणी अहवालातून स्पष्ट होणार आहे. सध्या ट्रॅप कॅमेऱ्याची तपासणी सुरू आहे. वाघांच्या झुंजीतून ही घटना झाली असावी, अशी दाट शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्रपकल्पाचे उपसंचालक नंदकिशोर काळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Last Updated : Jan 23, 2024, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.