ETV Bharat / state

दहीहंडीचं बक्षीस जिंकल्यानं सेलिब्रेशन केलं, पिकनिकवरुन परतणाऱ्या दोघांना कंटेनरनं चिरडलं - Two Killed Container Accident - TWO KILLED CONTAINER ACCIDENT

Two Killed Container Accident : पिकनिक करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. दहीहंडी फोडल्यानंतर बक्षीस रूपात मिळालेल्या रक्कमेतून पिकनिकसाठी हे सर्व गोविंदा गेले होते.

Two Killed Container Accident
अपघातात दोघांचा मृत्यू (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 9:05 PM IST

ठाणे Two Killed Container Accident : दहीहंडी फोडल्यानंतर बक्षीस रूपात मिळालेल्या रक्कमेतून पिकनिकसाठी गोविदांचं पथक गेलं होतं. त्यानंतर पिकनिक करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कंटेनर चालकानं जोरदार धडक दिली. भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई नाशिक महामार्गावरील शांग्रीला रिसॉर्टनजीक असलेल्या वडपे गावाच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा पोलिसांनी शोध सुरू केलाय. आशिष लालजीत वर्मा (वय १५, रा. भिवंडी) आणि खुर्शीद आलम उर्फ अयान नाजीर अली अन्सारी (वय १८, रा. भिवंडी) असे भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणांची नावं आहेत. तर राहुल हिरालाल प्रजापती (वय - २१) असे अपघातात जखमी झालेल्याचं नाव आहे.

दहीहंडीचं मिळालं होतं बक्षीस : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्याच आठवड्यात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या वतीनं लाखोंची रक्कम दहीहंडी फोडणाऱ्या पथकांना बक्षीस म्हणून दिली. त्यातच मृत आशिष आणि खुर्शीद आलम हे दोघेही भिवंडी शहरातील एका गोविंदा पथकात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकात सामील होते. पथकातील गोविंदांनी दहीहंडी फोडल्यानंतर बक्षीस रूपात मिळालेल्या रक्कमेतून पिकनिक करण्याचे ठरवले होते.

पिकनिकला गेले होते : त्यानुसार १ सप्टेंबर रविवार असल्यानं त्यांनी पिकनिकचा बेत आखला होता. पिकनिकसाठी शहापूर तालुक्यातील वाशिंद गावाच्या हद्दीत असलेल्या शंकर तावडे यांच्या फार्म हाऊसवर रविवारी सायंकाळच्या सुमाराला गोविंदा पथकातील २० ते २५ आप आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनाने गेले होते.

अपघातात दोघांचा मृत्यू : पिकनिक करून घरी परत येताना तीन मित्र एमएच ०४ एलव्हाय ८३७८ या ॲक्टिव्हा दुचाकीने २ सप्टेंबर रोजी (सोमवारी) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुंबई - नाशिक महामार्गाने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ते वडपे हद्दीत आले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात कंटेनरनं त्यांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला पडला. तर पाठीमागील दोघेही रस्त्याच्या मधोमध पडल्याने त्यांना कंटेनरनं चिरडून चालक पसार झाला. या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. मात्र, दोघांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल : दुचाकीवरील तिघांनाही उपचारासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. तर राहुल हा किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी राहुलच्या तक्रारीवरुन अज्ञात कंटेनर चालकाविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात कलम १०६,२८१ १२५, (ए ) १२५(बी) मो. का. कलम १८४, १८७ प्रमाणे सोमवारी सकाळच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

कंटेनर चालक फरार : घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला असून, मुंबई - नाशिक महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस फरार चालकाचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दिली. विशेष म्हणजे, मृत तरुणांचा पिकनिक करताना, नाचत दहीहंडीचा थर लावताना शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर या घटनेमुळे भिवंडीतील गोविंदा पथकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

  1. पुण्यात चार दशकांपासून आंदेकर टोळीचं वर्चस्व; टोळी प्रमुख ते राजकारणात एन्ट्री, कशी उदयास आली टोळी? - Pune Gang War History
  2. पोलिसांच्या ताब्यात असताना तरुणाचा धावत्या रेल्वेमधून पडून मृत्यू, उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निलंबित - Thane crime news
  3. प्रॉपर्टीच्या वादातून बहिणीचे केले तुकडे-तुकडे अन् दिले नदीत फेकून; भाऊ, पत्नी अटकेत - Brother Killing Sister Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.